Download App

होर्डिंग आणि पेट्रोल पंपाची किती कमाई ‘मातोश्री’वर जाते? सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

होर्डिंग आणि पेट्रोल पंपाची किती कमाई मातोश्री अर्थात उद्धव ठाकरेंकडे जाते व त्यात भांडूपचा हिस्सा किती? असा सवाल सोमय्यांनी केला.

Image Credit: letsupp

Kirit Somayya on Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) प्रचाराची धामधूम सुरू असतांना मुंबईत सोमवारी दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरधील पेट्रोलं पंपावर होर्डिंग कोसळून अनेकांचा मृत्यू झाला. या घटनेवरून राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता भापज नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकर (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांव (Sanjay Raut) निशाणा साधला.

Ramayan: रणबीरचा ‘रामायण’ हा देशातील सर्वांत महागडा चित्रपट; बजेटचा आकडा पाहून बसेल धक्का
होर्डिंग आणि पेट्रोल पंपाची किती कमाई मातोश्री अर्थात उद्धव ठाकरेंकडे जाते व त्यात भांडूपचा हिस्सा किती? असा सवाल सोमय्यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी बुधवारी घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेप्रकारणी बुधवारी एक निवदेन आणि व्हिडिओ जारी केला. त्यात त्यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. घाटकोपर पेट्रोल पंपाची जागा ही महाराष्ट्र सरकारच्या पोलिस हाऊसिंगची आहे. मात्र ऑक्टोबर 2021 मध्ये उद्धव ठाकरे सरकारने ही जागा बेकायदेशीरपणे पेट्रोल पंप लावण्यासाठी lords mark industries ltd कंपनीला दिली. तर होर्डिंग लावण्याचे कंत्राट भावेश भिंडे यांच्या मे. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले, असं सोमय्या म्हणाले.

संशयकल्लोळ थांबवा अन् गोडसेंना निवडून द्या; छगन भुजबळांची नाशिककरांना साद 

घाटकोपर पेट्रोल पंप आणि होर्डिंगमधून दरवर्षी 25 कोटी ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. या ५० कोटींतून किती पैसे मातोश्रीला जातात व किती पैसे भांडूपला जातात याचा हिशोब संजय राऊत देणार का? असा सवालही किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी भावेश भिंडे यांना उद्धव ठाकरेंकडे घेऊन गेल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे.

दरम्या,न होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी 45 तासानंतरही ढिगारा उसण्याचे काम सुरू आहे. बुधवारी या ठिकाणी एक लाल रंगाची कार अडकल्याची दिसून आली. त्यात दोन जण अडकले असण्याची शक्यता आहे. लोखंडी ढिगाऱ्यामुळं ही कार पूर्णपणे चेपली आहे. त्यामुळं त्यातील प्रवासी जिवंत असण्याची फार कमी शक्यता आहे. मुंबई महापालिका, एनडीआरएफ आणि मुंबई पोलीस घटनास्थळी मदतकार्य करत आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे होर्डिंगच्या ढिगाऱ्याखाली नेमके किती लोक दबलेत याची आकडेवारी प्रशासनाकडे किंवा अन्य कुणाकडेही नाही. त्यामुळे अजून 35 ते 40 लोक याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. हा अंदाज खरा ठरला तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज