Download App

दात पडलेला अन् नखं वाढलेला शक्तीहीन वाघ; पेडणेकरांची राज ठाकरेंवर बोचरी टीका

  • Written By: Last Updated:

Kishori Pednekar On Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला (Mahayuti) बिनशर्त पाठींबा दिला. नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे त्यांनी जाहीर केलं होतं. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी (Kishori Pednekar) प्रतिक्रिया दिला.

बिनशर्त पाठींबा दिल्यानंतर आज राज ठाकरेंनी पुन्हा पत्रकार परिषद घेतली. त्यावर बोलतांना पेडणेकर म्हणाल्या, दात निघालेला, नखं वाढलेला शक्तीहीन आणि नुसता तोडाने हवा मारणारा वाघ लोकांना नकोय, अशी टीका त्यांनी केली.

किशोरी पेडणेकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलतांना त्यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर दुसरी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज होती? राज ठाकरे म्हणतात इतर पक्ष निवडून आल्यावर त्यांच्या भूमिका बदलू शकतात, मग मी का बदलू नाही? पण, राज ठाकरे पक्ष स्थापनेपासून सातत्याने भूमिका बदलत आहे, अशी टीका त्यांनी केली.

त्या म्हणाल्या, 2019 मध्ये त्याची ‘लाव रे तो व्हिडिओ’ ही टॅगलाइन लोकप्रिय झाली होती. मात्र नंतर राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली. एवढचं कशाला राज ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडाही पक्ष स्थापनेपासून अनेकवेळा बदलण्यात आला आहे. राज ठाकरेंनी अनेक झेंडे बदलले, आधी निळा, मग हिरवा, मग थोडा, असं करत राज ठाकरेंनी झेंडे बदलले. त्यामुळं असा दात निघालेला, नखं वाढलेला शक्तीहीन आणि नुसता तोडाने हवा मारणारा वाघ लोकांना नकोय, अशी टीका पेडणेकर यांनी केली.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
आज पत्रकार परिषदेत बोलतांना ठाकरे म्हणाले की, देशातही एकाधिकारशाही ही देशासाठी घातक आहे. काही जण त्यांना उघड उघड बिनशर्त पाठिंबा देत आहेत. तर काहीजण लढण्याचे नाटक करून महायुतीला पाठिंबा देत आहेत, असं म्हणत त्यांनी राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांना टोला लगावला. हे नाटक जनता ओळखत आहे. आता थेट हुकूमशाही विरुद्ध लोकशाही अशी लढत होणार आहे, असं ठाकरे म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज