Kokan Vidhan Parishad Election : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष (ncp) व खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare ) आणि शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogwale) यांच्यामधील राजकीय संघर्ष सर्वश्रूत आहे. पालकमंत्रीपद असो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या होतात. त्यात दोघांमधील आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय संघर्ष टोकाला जातो. त्यातून दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना या दोघांची दखल घ्यावी लागते. आता तटकरे आणि मंत्री गोगावले यांच्यात पुन्हा राजकीय संघर्ष उफाळून येण्याची शक्यता आहे. कारण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेतील विधानपरिषदेच्या (Kokan Vidhan Parishad Election) जागेवर दोघेही दावा सांगू लागले आहे. दोघेही आपल्या मुलांसाठी फिल्डिंग लावत आहेत. तर इतर अनेक जण ही या जागेसाठी इच्छुक आहे.
विधान परिषदेचे बिगुल वाजले! ४६१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार
विधानपरिषदेच्या निवडणूक जाहीर होताच मंगळवारी मंत्री भरत गोगावले हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. दोघांमध्ये या जागेबाबत चर्चा झाली आहे. मंत्री गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हे येथून इच्छूक आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी गोगावले यांना कोणताही शब्द दिलेला नाही. सुनील तटकरे हे मुलगा अनिकेत तटकरे यांच्यासाठी आग्रही आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधील बदलामुळे सुनील तटकरे हे पक्षावर नाराज होते. त्यातून ते शरद पवार यांनाही भेटले होते. ही भेट राजकीय नव्हती, असे तटकरे यांनी जाहीर केलेले आहे. परंतु तटकरे हे मुलाला विधानपरिषदेवर घेण्याबाबत आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तटकरे यांची मुलगी अदिती तटकरे या महिला व बालकल्याण मंत्री आहेत. त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या नावाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी किती विचार करतात हा प्रश्न आहेच. शिवाय हे जागा राष्ट्रवादीला गेल्यास गोगावले यांचा त्यांना विरोध असणार आहे. कारण नगरपालिका निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी एकमेंकाविरुद्ध लढले आहेत. त्याचवेळी शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांचे नावदेखील चर्चेत आहे.
लाहोरमधील नावे बदलली ! प्रसिद्ध इस्लामपुरा आता कृष्णनगर, बाबरी मस्जिद चौकाचे नाव जैन मंदिर चौक
कोकणात कोणाची किती ताकद ? भाजप किंगमेकर
संख्याबळाच्या हिशोबाने कोकण विभागात शिंदेंच्या शिवसेनेचे पारडे जड असल्याचं मानलं जात आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे एकूण 831 मतदार सदस्य आहेत. त्यामध्ये एकट्या शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांचे 289 इतके संख्याबळ आहे. त्यात 77 जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती 18, नगरपालिका सदस्य 132 आहेत. तर दोन नंबर भाजपचे 285 सदस्य आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसची सदस्यसंख्या 106 इतकी आहे. त्यामुळे शिवसेना या मतदारसंघावर दावा ठोकत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे संख्याबळ जुळवून तटकरेंना ही जागा हवी आहे.
