कोल्हेंना विधान परिषद…भाजपचा डाव…कोपरगावात समीकरण बदलणार

Kolhe got Legislative Council Candidacy कोपरगाव हा मतदारसंघ म्हटला की काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वश्रुत आहे.

Kolhe Got Legislative Council Candidacy

Kolhe Got Legislative Council Candidacy

Kolhe got Legislative Council Candidacy BJP’s plan The equation will change in Kopargaon : सग्या सोयऱ्यांच्या राजकारणासाठी ओळखला जाणारा अहिल्यानगर जिल्हा हा तेवढाच पिढीजात संघर्षासाठी देखील ओळखला जातो. या जिल्ह्यातील कोपरगाव हा मतदारसंघ म्हटला की काळे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष सर्वश्रुत आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून जेव्हा आशुतोष काळेंना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा विवेक कोल्हे देखील उमेदवारीच्या तयारीत होते. मात्र भाजपच्या विनंतीवरून ते थांबले व काळे आमदार झाले. कोल्हे यांच्या त्यागाची दखल घेत भाजपाने त्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. यामुळे पहिल्यांदाच काळे आणि कोल्हे दोघेही आमदार विधान परिषदेत दिसणार.

मरेन पण घेतला वसा सोडणार नाही, लक्ष्मण हाके यांचं व्यंगचित्राच्या माध्यमातून हैद्राबाद गॅझेटवर भाष्य

काळे व कोल्हे यांचा पिढीजात सुरू असलेल्या संघर्ष त्यांच्या तिसऱ्या पिढीतही सुरूच आहे. कारण कोपरगाव मतदारसंघांमध्ये 2024 च्या विधानसभा निवडणुकीवेळी आशुतोष काळे यांना महायुतीच्या राष्ट्रवादीतील अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर झाली. तर विधानसभेसाठी भाजपकडून विवेक कोल्हे हे देखील इच्छुक होते. यामुळे मतदारसंघातच राजकीय पेच निर्माण झाला. यावेळी भाजपच्या वरिष्ठांकडून कोल्हे यांची समजूत काढत त्यांना माघार घेण्यास सांगितले व कोपरगाव मतदारसंघांमध्ये काळे हे आमदार झाले.

विधानसभेतील माघार … कोल्हेची राजकारणातील वाट बिकट

महायुतीत विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारालाच तिकीट देण्याचा फॉर्म्युला ठरला होता. या निर्णयाचा अनेक भाजपच्या प्रबळ दावेदार इच्छुक उमेदवारांना मोठा फटका सहन करावा लागला होता. त्यात कोपरगावच्या विवेक कोल्हेंचाही समावेश होता. कारण याठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आशुतोष काळे यांना पुन्हा एकदा विधानसभेची संधी मिळाली होती. खरंतर कोल्हे-काळे हे एकमेकांचे गेली कित्येक दशकं पारंपारिक प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत. आपली ताकद असूनही युतीधर्म म्हणून विवेक कोल्हेंवर विधानसभेला माघार घेण्याची वेळ आली होती.

खुनाच्या प्रयत्नातील दोन संशयित आरोपी जेरबंद; पुणे येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात

भाजपच्या वरिष्ठ्यांच्या शब्दाला मान देत कोल्हे यांनी माघारही घेतली. मात्र यामुळे त्यांचे राजकीय भविष्यातील राजकीय वाटचाल हे बिकट झाली. त्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत होती. दरम्यान कुठल्या यांना राज्यसभेवर घेतले जाणार असे देखील चर्चा सुरू होती. मात्र त्यामध्ये त्यांचे नाव समोर आले नाही. मात्र विवेक यांनी केलेल्या त्यागाचे दखल घेत भाजपाने विधान परिषदेवरती विवेक कोल्हे यांची नियुक्ती केली.

कोल्हे यांची उमेदवारी भाजपचा दूरदृष्टी कोण

विवेक कोल्हेंना मोठा राजकीय वारसा लाभला असून त्यांच्या मातोश्री स्नेहलता कोल्हे या कोपरगावच्या माजी आमदार राहिल्या आहेत. तर आजोबा शंकरराव कोल्हे हे तालुक्याचे सहावेळा आमदार राहिले होते. विधान परिषदेसाठी भाजपनं त्यांना संधी देताना भविष्याचा विचार केलेला आहे. विवेक कोल्हे यांनी अगदी कमी वयात कोपरगाव तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणावरही मोठी छाप पाडली आहे. दरम्यान विधान परिषदेवरती कोल्हे यांना माझ्याकडून संधी देण्यात आली आहे, मात्र काळे आणि कोल्हे यांच्यामधील संघर्ष 2029 च्या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळणार नाही हे बोलणे घाईचे ठरेल.

Exit mobile version