Download App

मोठी बातमी! महायुतीचे उमेदवार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा

  • Written By: Last Updated:

Koli Federation Support to MLA Sambhajirao Patil Nilangekar : निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे (Mahayuti) उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) यांना कोळी महासंघाने जाहीर पाठिंबा दिलाय. जाहीर पाठिंब्याचे पत्र कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी कोळी महासंघाचे पदाधिकारी युवा अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे मच्छीमार सेलचे प्रदेश अध्यक्ष चेतन पाटील, उपाध्यक्ष शिवशंकर फुले, सहसचिव सतीश धडे, मराठवाडा संपर्कप्रमुख गोविंद शोधले, (Assembly Election 2024) जिल्हाध्यक्ष पंडित हुलसुरे, युवा जिल्हाध्यक्ष संजय राजवडे, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजीत यादगिरी आणि कार्यकर्त्यांमार्फत भाजपा प्रदेश सरचिटणीस युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर याना देण्यात आलं.

निलंगा विधानसभेचे भाजपा महायुतीचे उमेदवार माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांना जाहीर पाठिंबा देण्यात आलाय. कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार रमेश दादा पाटील यांनी आपल्या जाहीर पाठींब्याच्या पत्रात असं नमूद केलंय की, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळाल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केलंय.

नागरिकांच्या विश्वासाला तडा जाऊ न देता मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करू; यशोमती ठाकूर यांची ग्वाही

कोळी समाजाची शिखर संस्था असलेल्या आणि महायुतीचा घटक असलेल्या कोळी महासंघ या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 करता आपणास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे. आपल्या विधानसभा क्षेत्रातील कोळी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना आपण आपल्या प्रचारामध्ये सामावून घेऊन त्यांना सन्मान करून सन्मानाची वागणूक द्यावी. सर्व कोळी समाज आपल्या प्रचाराचे प्रामाणिक काम करेल, तसेच महायुती शासनाच्या काळात घेतलेल्या अनेक कल्याणकारी आणि लोक उपयोगी निर्णयाची आणि योजनाची माहिती गाव-खेड्यात, वाडी वस्ती तांड्यावरील सर्वसामान्य कष्टकरी जनतेपर्यंत पोहोचवून आपल्याला विजयी करण्याकरिता कोळी महासंघाचे सर्व कार्यकर्ते महत्त्वाची भूमिका बजावतील, असा आम्हाला विश्वास आणि खात्री आहे.

दिलीप वळसे पाटील साहेबांनी आम्हाला मोठं केलंय, तालुक्याचा विकास केलाय ; विष्णू काका हिंगे

आपल्या मतदारसंघातील आदिवासी कोळी समाज अनेक वर्षापासून जातीचे दाखले आणि जातवैधता प्रमाणपत्र सुलभरित्या मिळवण्याकरता प्रयत्न करीत आहे. त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. त्यामुळे आपण नव्याने होणाऱ्या विधानसभेमध्ये कोळी समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न मांडून हा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या स्तरावरून प्रयत्न करून कोळी समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती आमदार रमेश दादा पाटील यांनी केलीय. आपण या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिकेने निवडून येण्याकरता कोळी महासंघाचा जाहीर पाठिंबा शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रावर कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश दादा पाटील ,कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, सरचिटणीस राजहंस टपके,यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

follow us