Kuldip Konde Joined Eknath Shinde group: शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे (Kuldip Konde) यांनी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला आहे. पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. कोंडे यांच्या पक्षप्रवेशाने भोर, वेल्हा आणि मुळशी या तालुक्यात शिवसेना आणि महायुतीची ताकद वाढल्याचे बोलले जाते.
मी शारदाबाई पवारांची नात आहे, तुम्हाला काय वाटलं? सुप्रिया सुळे कडाडल्या
कोण आहेत कुलदीप कोंडे?
कुलदीप कोंडे हे मागील 14 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द केळवडे गावच्या उपसरपंचपदापासून सुरू झाली आहे. 2012 मध्ये उपसरपंच असतानाच त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर नसरापूर -वेळू गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. 2014 मध्ये शिवसेनेने त्यांना भोर-वेल्हा-मुळशी मतदारसंघातून तिकीट दिले. त्यावेळी त्यांनी तब्बल 58 हजार मतं घेत काँग्रेसचे उमेदवार संग्राम थोपटे यांना घाम फोडला होता. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी 99 हजार 716 मतदान घेतली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर कोंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याची भूमिका घेतली होती. कालपर्यंत ते शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा संघटक होते. मात्र भोर विधानसभेतील पारंपरिक विरोधक थोपटे आणि काँग्रेसशी जमवून घेणे त्यांना अवघड जात होते. प्रचारातही ते फारसे सहभागी नव्हते. त्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेरीस त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
BJP ने भावना गवळी, हेमंत पाटलांचा बळी दिला, शिंदेंना चक्रव्युहात अडकवलं; नवलेंचा गंभीर आरोप
विजयबापूंनी दाखवली मैत्री!
लोकांनी आमची दुश्मनी पाहिली, आता दोस्ती पाहूद्या, असं म्हणत काही दिवसांपूर्वी पुरंदरचे माजी आमदार विजय बापू शिवतारे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी जुळवून घेतले होते. आता याच शिवतारे यांनी कोडें यांच्या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेऊन अजित पवार यांना दोस्ती काय असते हे दाखवून दिले आहे.
विजय शिवतारे यांच्या या कृतीचे अजितदादांनी भर मंचावरुनच कौतुक केले. “विरोधक कसा असावा लागतो, हे यांच्याकडे बघून शिका. मित्रही कसा असावा लागतो, तेही विजयबापूंकडे बघून शिका. एकदा मैत्री केली की, पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण मैत्रीला अंतर पडू देत नाही. अशापद्धतीचे काम विजय शिवतारेंचे असल्याचे म्हणत अजित पवारांनी त्यांचे कौतुक केले.