Download App

कुणाल कामरा प्रकरण, शिवसैनिक आक्रमक सेटची तोडफोड अन् 40 जणांवर गुन्हा दाखल

Kunal Kamra On Eknath Shinde : सोशल मीडियावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे

  • Written By: Last Updated:

Kunal Kamra On Eknath Shinde : सोशल मीडियावर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.  एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात कुणाल कामराने गाणं म्हटलं आहे. मात्र त्यानंतर आता या प्रकरणात शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड करत त्याला धमकी दिली आहे. तसेच कुणाल कामराने (Kunal Kamra) माफी मागावी अशी मागणी देखील शिवसैनिकांनी (Shiv Sainik) केली आहे. तर दुसरीकडे तोडफोड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 40 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तोडफोड प्रकरण 40 शिवसैनिकांवर गुन्हे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका कार्यक्रमात कुणाल कामराने केलेल्या गाण्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणात कुणाल कामरा याच्या खार येथील सेटवर शिवसैनिकांनी तोडफोड केली आहे तर दुसरीकडे सेटची तोडफोड करणाऱ्या 40 शिवसैनिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कुणाल कामरा याला सपोर्ट केला आहे. कुणाल कामरा याने केलेले गाणं 100 टक्के खरं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. तर या प्रकरणात राज्याचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी देखील प्रतिक्रिया देत कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. हा कुणाल कामरा कोण आहे? जर एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही गाणे गायले असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. आमचे आमदार मुरजी पटेल हे कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करतील. त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक आक्रमक होतील. अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी देखील कुणाल कामरा याला इशारा दिला आहे. भाड्याचे कॉमेडियन काही पैसे घेतात अन् टीका-टिप्पणी करतात. आमच्या नेत्यावर टिप्पणी केली आहे. कुणाल कामरा तू आता महाराष्ट्रात नाही तर भारतातही कुठे फिरू शकणार नाही. आमचे शिवसैनिक तुला जागा दाखवतील. अशी धमकी नरेश म्हस्के यांनी कुणाल कामरा याला दिली आहे.

कर्ज घेण्याचा विचार पण CIBIL Score खराब? तर ‘ही’ महत्वाची गोष्ट जाणून घ्या, होईल फायदा

नेमकं प्रकरण काय?

एका कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने महाराष्ट्राच्या सध्या राजकारणावर एक कविता सादर केली. या कवितेच्या माध्यमांतून त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. त्याने आपल्या कवितेत म्हटले की, ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से देखो तो गद्दार नजर आये….

follow us