देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे, जवळचं कोण?, अजितदादांचं एकाच वाक्यात उत्तर, म्हणाले मला…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार महायुतीत दाखल झाले. विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवले. आता अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीही आहेत. त्यांच्या पक्षातील आमदार मंत्री आहेत. महायुतीचं सरकार स्थिर झालं आहे. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोण जास्त जवळचं वाटतं या प्रश्नाचं उत्तर खुद्द अजित पवार यांनीच दिलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत अजित पवार यांनी राजकीय मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केले. धनंजय मुंडे यांचा राजीनामा, संतोष देशमुख हत्याकांड या मुद्द्यांवरही स्पष्ट मत व्यक्त केलं.
देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे तुम्हाला जास्त जवळचे कोण वाटतात असा प्रश्न विचारला असता, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे तेच जवळचे. मी सध्या कुणालाच नाराज करणार नाही. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या तर मी माझ्या पद्धतीने चांगले संबंध ठेवले आहेत अशा स्पष्ट शब्दांत अजित पवार यांनी उत्तर दिले. आता त्यांच्या या उत्तराने शिंदे गटात कदाचित अस्वस्थताही निर्माण होऊ शकते.
औरंगजेब कबरीच्या प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले अजित पवार; नाव न घेता ‘या’ मंत्र्याचे टोचले कान
..म्हणून पुन्हा उपमुख्यमंत्री झालो
सर्वात उत्तम मुख्यमंत्री म्हणून मला विलासराव देशमुख वाटतात. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अतिशय उत्तम कारभार केला असेही अजित पवार यावेळी म्हणाले. मी व्यवहारी माणूस आहे. आमचे 41 आमदार होते. भाजपचे 132 आमदार आले होते, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार हे त्रिवार सत्य होतं. देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या किती जवळ आहेत हे मला माहिती होतं. त्यामुळं वेळ न घालवता उपमुख्यमंत्री व्हावं असं मला वाटलं असे अजित पवार एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
प्रत्येक पक्ष निर्विवाद सरकार कसं येईल याचा प्रयत्न करणारच. 1985 नंतर राज्यात कधीही एका पक्षाचं सरकार आलं नाही. सगळीकडील लोक वेगळा विचार करतात. मला वाटत नव्हतं की राज्यात कोणाचे एकाचे सरकार येईल, कोणाची ना कोणाची मदत घ्यावीच लागणार होती, असे अजित पवार यांनी सांगितले. माझं काम नेहमीच स्ट्रेट फॉरवर्ड असतं. त्यामुळे बीड असो की पुणे चुकीचं वागला तर त्याच्यावर कारवाई होणारच असा इशाराही अजित पवार यांनी यावेळी दिला.
बीडमध्ये सुसज्ज विमानतळ उभारणार! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधिमंडळात अधिकृत घोषणा
भुजबळांनी राज्यसभेत जावं असं वाटत होतं
छगन भुजबळ यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी काम केलं आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेतही ते होते. आता त्यांनी राज्यसभेवर जावं असं मला वाटत होतं. यात भुजबळांना नाराज करण्याचा माझा किंवा पक्षाचा कोणताही हेतू नव्हता असे उत्तर अजित पवार यांनी दिले. मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून छगन भुजबळ नाराज आहेत अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. अजित पवारांनी या मुद्द्यावर पुन्हा एकदा स्पष्ट उत्तर दिल्याने या चर्चा थांबतील असे सांगण्यात येत आहे.