Download App

राहुरीत शिवाजीराव कर्डिलेंना दिला लहुजी शक्ती सेनेने जाहीर पाठिंबा, म्हणाले मोठ्या मताधिक्क्याने….

  • Written By: Last Updated:

Lahuji Shakti Sena Support To Mahayuti candidate Shivajirao Kardile : राहुरी-पाथर्डी-नगर तालुका मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करण्यासाठी लहुजी शक्ती सेना (Lahuji Shakti Sena) आता मैदानात उतरली आहे. आज बुधवारी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. शिवाय शिवाजीराव कर्डिले यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करू, असं आव्हान (Assembly Election 2024) दिलंय.

राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार तनपुरे यांना ज्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला, त्या लहुजी शक्ती सेनेच्या नावाने त्यांचा आमचा काही संबंध नाही. कारण, महायुतीचा घटक हा लहुजी शक्ती सेना आहे, असं म्हणत त्यांनी पाठिंबा (Mahayuti candidate Shivajirao Kardile) दर्शवला. याप्रसंगी सुनील शिंदे(जिल्हा अध्यक्ष), किरण उमाप(जिल्हा महासचिव), जयवंत गायकवाड( जिल्हा संपर्कप्रमुख), लक्ष्मण निकक्षे( तालुकाध्यक्ष), संदीप अवचिते(विधानसभा अध्यक्ष), प्रवीण वैरागर(श्रीरामपूर शहर अध्यक्ष), आकाश जगधने(युवा अध्यक्ष) संतोष उमाप, संतोष खंडागळे,कुणाल जाधव, अतुल जाधव, अनिल वैरागर, सागर शेलार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

50 वर्षे सत्तापद घेऊनही विद्यमान लोकप्रतिनिधींनी काहीच केलं नाही; डॉ. अतुलबाबा भोसलेंचा विरोधकांवर हल्लाबोल

राहुरी शहरात आज महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डीले यांची अभूतपूर्व प्रचार फेरी निघाली होती. यावेळी कर्डिले यांच्या प्रचारसभेला नागरिकांनी मोठी हजेरी लावलेली होती. कर्डिले यांचं चौकाचौकात पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलंय. भर उन्हात महिला, पुरुष, व्यापारी, व्यावसायिक, मागासवर्गीय समाज, तरूणाई उपस्थित होती. यावेळी शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, माझ्या विजयाने राहुरी दहशतमुक्त होणार आहे.

काँग्रेसने 60 वर्षात जेवढी कामे केली, तेवढी आपल्या शासनाने 10 वर्षात केली ; आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर

यावेळी शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, राहुरी शहरात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उद्याच्या निकालानंतर आमदार होताच, मी शासनाच्या योजनांची अंमलबजावणी सुरू करेल. मागासवर्गीयांना हक्काचं घरकुल मिळवून देईल. राहुरी कोणाच्या दहशतीखाली आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे राहुरी खऱ्या अर्थाने दहशतमुक्त होण्याचे काम माझ्या विजयाने 23 तारखेला होणार आहे, असा विश्वास राहुरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला.

 

follow us