Download App

ओबीसी अन् मराठ्यांबाबत माझ्याशी बोललेलं पवारांनी जनतेला सांगावं; लक्ष्मण हाकेंचा नवा बॉम्ब

Lakshaman Hake यांनी शरद पवारांबाबत एक गौप्यस्फोट केला. त्यांच्या भेटीतील गोष्टी जनतेसमोर सांगण्याच आव्हान हाके यांनी शरद पवारांना दिलं आहे.

Lakshaman Hake secret explosion about Sharad Pawar : वडीगोद्री येथे ओबोसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये या मागणीसाठी उपोषण करणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshaman Hake) यांनी काल (22 जून) आपल्या उपोषणाला स्थगिती दिली. त्यानंतर आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. तसेच त्या भेटीतील गोष्टी जनतेसमोर सांगण्याच आव्हान देखील हाके यांनी शरद पवारांना दिलं आहे.

काय म्हणाले लक्ष्मण हाके?

जरांगे यांच्या आंदोलनावर मराठा समाजातील नेते गप्प आहेत. मात्र त्यांनी आळीमिळी गुपचिळी असं धोरण अवलंबून नये. कारण शरद पवार यांची दोन-तीन महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर माझी भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी माझ्याशी ओबीसी आणि मराठा समाजाविषयी जे काही दोन-तीन वाक्य बोलले आहेत. ते त्यांनी जनतेसमोर बोलावे. जेणे करून ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजामधील संभ्रम दूर होईल. कारण शरद पवारांचा महाराष्ट्रावर प्रभाव आहे. तसेच शरद पवार हे पहिले मुख्यमंत्री होते. ज्यांनी त्यांच्या राज्यामध्ये मंडल आयोगाचे अंमलबजावणी केली.

“सांगलीत काँग्रेस-राष्ट्रवादीनं काम केलं नाही”; पवारांनंतर राऊतांचाही आघाडीत मिठाचा खडा!

मात्र शरद पवार हाके यांना ओबीसी आणि मराठा समाजाविषयी नेमकं बोलले. ते हाके यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे आता आरक्षणाबाबत पवारांची नेमकी भूमिका काय आहे? त्याबाबत चर्चांना उधान आले आहे. तसेच हाके यांच्या या नव्या बॉम्बमुळे शरद पवारांच्या आरक्षणाबाबच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गृहमंत्र्यांवर आरोप केले की भाजपचे लोक नाराज होतात; पुणे अपघात अन् ‘नीट’ पेपर लिकवरून सुप्रिया सुळेंची टीका

दरम्यान जरांगेंच्या आंदोलनाला भेट देऊन शरद पवार यांनी आपण मराठा आरक्षणाच्या पाठिमागे असल्याचं देखील त्यांनी सुचवलं होतं. मात्र त्यानंतर पवार अद्याप आरक्षणाच्या बाबतील ठाम भूमिका घेतलेले दिसत नाही. दुसरीकडे ओबीसी आंदोलनामागे मात्र छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांसारखे ओबीसी नते जाहीर पाठींबा देत आहेत.

follow us