Download App

ललित पाटील अजूनही ठाकरेंच्या शिवसेनेत; नीलम गोऱ्हेंचा गंभीर आरोप

  • Written By: Last Updated:

Neelam Gorhe on UBT : गेल्या काही दिवासंपासून ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) हे प्रकरण चांगलचं गाजत आहे. राज्यातील मंत्रीही यात गुंतल्याचा आरोप विरोधकांनी केला. ललित पाटील प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी मंत्री दादा भुस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभुराज देसाई यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपाला आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.

ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी… 

आज माध्यमांशी बोलतांना नीलम गोऱ्हे यांनी ललित पाटील प्रकणावरून सत्ताधाऱ्यांवर होत असलेल्या आरोपाविषयी विचारले असता त्या म्हणाल्या की, ललित पाटीलने 2016 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळी शिवसेनेत फूट पडलेली नव्हती. संजय राऊत हे त्यावेळी अंत्यत ज्ञानी आणि झुंजार संपर्क नेते होते. आपल्या पक्षात कशी माणसं येतात, ते काय करतात हे पाहणं जशी उद्धव ठाकरेंची जबाबदारी होती, तशीच राऊतांची देखील जबाबदारी होती, अशा शब्दात राऊतांवर निशाणा साधला.

त्या म्हणाल्या, ललित पाटीलची चौकशी करायला हवी होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर दादा भुसे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मात्र ललित पाटील हा ठाकरे गटातच आहेत. 2016 मध्ये तो पक्षात आला होता, त्यानंतर तो पक्षाच्या बाहेर गेलाच नाही. त्याने अजूनही पक्ष सोडला नाही किंवा राजीनामा दिला नाही. मग हा माणूस त्यांचा आहे असे ठाकरे गट कशाच्या आधारावर म्हणत आहात? अशा प्रकारे दिशाभूल करणे चुकीचे आहे, असं म्हणणं चुकीचं आहे, असं त्या म्हणाल्या.

ललित पाटील प्रकरणाचा जो तपास करण्यात येईल, त्या तपासामध्ये आरोग्य आणि वैद्यकीय अभ्यास असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावी, अशी मागणी देखील नीलम गोऱ्हे यांनी केली.

या प्रकरणात अन्न व औषध प्रशासनही तितकेच जबाबदार असल्याचे त्या म्हणाल्या. अशा अवैध औषध कारखान्यांना अन्न व औषध प्रशासन दुर्लक्ष कसे करू शकते, असा सवालही गोऱ्हे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची वैद्यकीय मंत्र्यांनी दखल घ्यावी. तसेच या प्रकणाचा तपास एसआयटी किंवा सीआयडीकडे सोपवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

Tags

follow us