ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी…

  • Written By: Published:
ललित पाटील प्रकरणी प्रज्ञा कांबळे, अर्चना निकम यांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी…

पुणे : पुण्यातील ससून रूग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला (Lalit Patil) चेन्नईत मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर त्याला मदत करणाऱ्या अर्चना किरण निकम (Archana Kiran Nikam) आणि प्रज्ञा अरुण कांबळे (Pragya Arun Kamble) यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावणी आहे.

अजितदादांनी आणखी एक निर्णय घेण्यास भाग पाडले ! शिखर बँकेतून शासकीय कार्यालयांचे व्यवहार होणार 

ड्रग्ज माफिया ललित पाटीलला मुंबई साकीनाका पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. ललितला ससूनमधून पळून जाण्यास मदत करणाऱ्या दोन महिलांना पुणे पोलिसांनी काल नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली. अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे अशी या आरोपी महिलांची नावं आहे.

ललित ससूनमधून गेल्यानंतर तो नाशिकमध्ये मुक्कामाला होता. या ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था या दोघांनी केली होती. फोनच्या माध्यमातून ललित हा या महिलांच्या संपर्कात होता, असं पोलीस तपासात समोर आलं आहे. दरम्यान, त्यांना अटक केल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघींना चार दिवसांची म्हणजे 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी महिलांच्या बाजूने वकील तेजस पुणेकर आणि समीर इनामदार यांनी त्यांची बाजू मांडली. तर सरकारी वकील नीलम यादव इथापे यांनी बाजू मांडली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

न्यायाधीश ए.सी.बिराजदार यांना माहिती देताना तपास अधिकारी म्हणाले, आरोपी ललित पाटील हा 2 ऑक्टोबर रोजी पळून गेला. त्यानंतर त्याला या दोन्ही आरोपींनी 25 लाख रूपयांची मदत केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे एकूणच हे प्रकरण लक्षात घेऊन अधिक तपासासाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

आरोपीचे वकील तेजस पुणेकर आणि समीर इनामदार यांनी 7 दिवसाच्या पोलिस कोठडीला विरोध दर्शविल्यावर सरकारी वकील नीलम यादव इथापे यांनी देखील बाजू मांडली. त्यावर न्यायाधीश बिराजदार यांनी सात दिवसांऐवजी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काय खुलासे होतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube