Download App

‘भुजबळांना अडीच वर्षांसाठी उपमुख्यमंत्री करणार का?, मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर हाकेंचा अजितदादांना सवाल

अजित पवारांनी ओबीसी मतांचा अपमान केला आहे, असं म्हणत अजित पवारांनी भुजबळांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करणार का?  हे सांगावं, असं हाकेंनी म्हटलं.

  • Written By: Last Updated:

Laxman Hake On Ajit Pawar : राज्यातील देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रविवारी पार पडला. नागपुरात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळात अनेक नवीन चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी दिली गेली. मात्र, ज्येष्ठ नेते  छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नसल्यानं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.

‘जय श्री राम’ची घोषणा देणे…गुन्हा कसा? सुप्रीम कोर्टाचा सवाल 

अजित पवारांनी ओबीसी मतांचा अपमान केला आहे, असं म्हणत अजित पवारांनी भुजबळांना अडीच वर्ष मुख्यमंत्री करणार का?  हे सांगावं, असं हाकेंनी म्हटलं.

आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाकेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं. भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याबद्दल हाकेंना विचारले असता ते म्हणाले की, छगन भुजबळ हे विधीमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यामुळं  त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागे नेमकी काय कारणे होती? याचे उत्तर अजित पवारांनी द्यावे. त्याचबरोबर अडीच वर्षांच्या मंत्रिपदाचा पायंडा पाडणाऱ्या अजित पवारांनी अडीच वर्षांसाठी भुजबळांना उपमुख्यमंत्री करणार का? हे पुढं येऊन सांगावं, असं हाके म्हणाले.

‘तू डोनाल्ड ट्रम्पची जागा घे मला काय करायचंय’; मनोज जरांगेंचं भुजबळांना थेट उत्तर 

यावेळी लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काल झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना स्थान मिळाल्याने ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीला  आनंद झाला आहे. मात्र दुसरीकडे छगन भुजबळ गेल्या अनेक वर्षांपासून ओबीसी समाजाच्या न्यायासाठी लढा देत असून त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही, अशी खंत हाकेंनी बोलून दाखवली.

पुढं ते म्हणाले की, ओबीसी आरक्षण टिकवणे महत्त्वाचे आहे. ओबीसींचे अनेक प्रश्न समोर असताना भुजबळांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं. अजित पवार यांना जयंत पाटील आणि रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे होते, त्यामुळे भुजबळांवर अन्याय झाला, असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला.

राष्ट्रवादीकडून कोणी घेतली मंत्रिपदाची शपथ ? 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने धक्कातंत्र वापरत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील आणि धर्मरावबाबा आत्राम यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही. काल राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, बाबासाहेब पाटील, नरहरी झिरवाळ, दत्ता  भरणे, माणिकराव कोकाटे, मकरंद पाटील आणि इंद्रनील नाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

follow us