Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पुन्हा पवार काका-पुतण्यांना लक्ष्य केलं. पवार कुटुंबीय म्हणजे ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी (British East India Company) आहे. तर अजित पवार (Ajit Pawar) हे ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदार आणि कारखानदारांचे नेते आहेत, अशी जहरी टीका हाके यांनी केली. तसेच ते जायीयवाद करत असल्याचा आरोपही हाकेंनी केला.
निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ आरोपांची चिरफाड; SIR’ ते मत चोरीवर दिलं थेट उत्तर
लक्ष्मण हाकेंनी हे शनिवारी रात्री पुरंदर तालुक्यातील निरा येथे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पवार कुटुंबियांवर जोरादर टीका केली. राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबिय हे नेहमीच सत्तेत बसलेले असतात. त्यांच्याकडे नेहमीच तिजोरीची चाव्या असतात. त्यामुळंच मला त्यांच्यावर बोलावं लागंत. राज्यात कोणाचीही सत्ता येऊ द्या, मग ते भाजप असो, काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरेंचे सरकार असो, पवार कुटुंबीय नेहमीच सत्तेत असते आणि तिजोरीच्या चाव्याही त्यांच्याकडेच असतात. पवार हे सत्तेत असतात, म्हणून सत्ताधाऱ्यांना प्रश्न नाही विचारायचे, तर कोणाला विचारायचे? असा प्रश्न हाकेंनी केला.
मतचोरी नाहीच! राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं जोरदार प्रत्युत्तर, पत्रकार परिषदेत…
तर, खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या वडिलांच्या मायलेजवर निवडून येतात. संसदेत त्यांचं काय काम आहे? म्हणून त्यांना आदर्श संसदरत्न पुरस्कार मिळतो? असा सवालही हाकेंनी उपस्थित केला. सुळेंनी कधी तळागाळातील लोकांचे प्रश्न संसदेत मांडले आहेत का? त्यांनी कधी त्याच्यावर आवाज उठवला का?, असंही हाके म्हणाले.
यावेळी लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली आहे. या माणसाला संविधान कळत नाही. केवळ दादागिरीच्या जोरावर आरक्षण मिळत नाही. आरक्षण संविधानानुसार मिळतं. मात्र, जरांगे मराठा विरुध्द संघर्ष पेटू पाहत आहेत. त्यामुळे भविष्यात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाल पेटू शकतो. मुख्यमंत्र्यांनाी सावध राहावं, असा इशारा हाकेंनी दिला.