मतचोरी नाहीच! राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं जोरदार प्रत्युत्तर, पत्रकार परिषदेत…

मतचोरी नाहीच! राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं जोरदार प्रत्युत्तर, पत्रकार परिषदेत…

India Election Commission Press Conference On Rahul Gandhi : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या मत चोरीच्या आरोपांबाबत आणि बिहारमधील एसआयआरबाबत भारताचे मुख्य निवडणूक (India Election Commission) आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी रविवारी मोठी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी मत चोरीच्या आरोपांना पूर्णपणे फेटाळून लावले. यासोबतच ते म्हणाले की निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष समान (Gyanesh Kumar Press Conference) आहेत. निवडणूक आयोग कोणाशीही भेदभाव करत नाही.

स्थलांतरणामुळे वेगवेगळ्या ठिकाणी मतदारांचे नाव आले, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिलं आहे. निवडणूक पहाडासारखा मतदारांसमोर आहे. हे काम घाईत केल्यास चुकीच्या मतादाराचं नाव काढलं जावू शकतं, त्यामुळे निवडणूक आयोगाने घाईत हे केलं नव्हतं. निवडणूक आयोगाने मृत व्यक्तींचे नावं असलेले याद्या, तसेच रिपीट नावांच्या याद्या राजकीय पक्षांना देण्यात आल्या होत्या.

मतदार यादीत सुधारणा

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, गेल्या दोन दशकांपासून जवळजवळ सर्व राजकीय पक्ष मतदार यादीत सुधारणा करण्याची मागणी करत आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी निवडणूक आयोगाने बिहारमधून सुरूवात केली आहे. एसआय प्रक्रियेत, सर्व मतदार, बूथ लेव्हल अधिकारी आणि सर्व राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या 1.6 लाख बीएलओंनी एकत्रितपणे एक मसुदा यादी तयार केली. ही प्रत सर्वांना देण्यात आली आहे. ही यादी सर्व राजकीय पक्षांनी स्वाक्षऱ्यांसह सत्यापित केली.

नाशिकमध्ये आमचे 7 आमदार, पालकमंत्रीपद आम्हालाच मिळायला पाहिजे; मंत्री भुजबळ स्पष्टच बोलले

परवानगीशिवाय माध्यमांसमोर सादर

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले, आम्ही काही दिवसांपूर्वी पाहिले की अनेक मतदारांचे फोटो त्यांच्या परवानगीशिवाय माध्यमांसमोर सादर करण्यात आले. त्यांच्यावर आरोप करण्यात आले, त्यांचा वापर करण्यात आला. निवडणूक आयोगाने कोणत्याही मतदाराचे, मग ती त्यांची आई असो, सून असो, मुलगी असो, सीसीटीव्ही व्हिडिओ शेअर करावे का? ज्यांची नावे मतदार यादीत आहेत त्यांनीच त्यांच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी मतदान केले.

मेंदू खाणाऱ्या अमीबाचा कहर! 9 वर्षीय मुलीचा मृत्यू; केरळमध्ये वर्षभरात चौथा बळी

निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून…

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत एक कोटींहून अधिक कर्मचारी, 10 लाखांहून अधिक बूथ लेव्हल एजंट, उमेदवारांचे 20 लाखांहून अधिक मतदान एजंट काम करतात. इतक्या लोकांसमोर इतक्या पारदर्शक प्रक्रियेत, कोणताही मतदार आपले मत चोरू शकतो का? काही नेत्यांवर दुहेरी मतदानाचा आरोप आहे. जेव्हा पुरावे मागितले गेले, तेव्हा कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. अशा खोट्या आरोपांना निवडणूक आयोग किंवा कोणताही मतदार घाबरत नाही. निवडणूक आयोगाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारतातील मतदारांना लक्ष्य करून राजकारण केले जात असताना, आज निवडणूक आयोग सर्वांना हे स्पष्ट करू इच्छितो की, निवडणूक आयोग निर्भयपणे गरीब, श्रीमंत, वृद्ध, महिला, तरुणांसह सर्व वर्ग आणि सर्व धर्मांच्या मतदारांसोबत दगडासारखा उभा आहे, कोणताही भेदभाव न करता उभा आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube