निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ आरोपांची चिरफाड; SIR’ ते मत चोरीवर दिलं थेट उत्तर

निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ आरोपांची चिरफाड; SIR’ ते मत चोरीवर दिलं थेट उत्तर

Election Commission on Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर आरोप केले होते, त्यानंतर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमधून निवडणूक आयोगानं राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही, आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी ना कुणी विरोधक आहे, आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत, असं यावेळी निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

निवडणूक आयोग राजकीय पक्षांमध्ये भेदभाव करत नाही, आमच्यासाठी ना कुणी सत्ताधारी ना कुणी विरोधक आहे, आमच्यासाठी सर्व पक्ष समान आहेत. गेल्या वीस वर्षांपासून सर्व पक्ष निवडणूक यादीत दुरुस्तीची मागणी करत होते. दुरुस्तीच्या मागणीमुळेच बिहारमध्ये एसआयआर करण्यात आला आहे. आता बिहारमध्ये नाव दुरुस्तीसाठी अजूनही 15 दिवस बाकी आहेत. राजकीय पक्षांनी या 15 दिवसांमध्ये त्रुटी सांगाव्यात असं आवाहान यावेळी निवडणूक आयोगाकडून करण्यात आलं आहे.

मतचोरी नाहीच! राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं जोरदार प्रत्युत्तर, पत्रकार परिषदेत…

निवडणूक आयोगाने आपल्या पत्रकार परिषदेत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना खोडून काढलं आहे. सात कोटीपेक्षाही अधिक मतदार निवडणूक आयोगासोबत आहेत. निवडणूक आयोग तसेच मतदारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही. नियमानुसार मतदार याद्यांमधील त्रुटी सांगाव्या लागतात.

मतदारांना मतदान प्रक्रियेवर काही आक्षेप असतील तर निवडणुकीच्या 45 दिवसांनी उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करावी लागते. यापैकी काहीही न करता फक्त मतचोरीचे आरोप केले जात आहेत, असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यावेळी म्हणाले. तसेच मतचोरीसारखे चुकीचे शब्द वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला जात आहे. हा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाचा अपमानच आहे, असे प्रत्युत्तरही ज्ञानेश कुमार यांनी विरोधकांना दिले.

 

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube