Laxman Hake : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचं नाव आल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. सत्ताधारी आमदार सुरेश धस देखील मुंडेंना टार्गेट करत आहेत. यावर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी भाष्य केलं.
Video : ऐसा लगानेका अन् रात्रभर बांगो बांगो बांगो; धनुभाऊंचा फोटो दाखवत धसांचा नवा गौप्यस्फोट
मुंबई तक या वृत्त वाहिनीशी बोलतांना हाके म्हणाले की, लोकनियुक्त प्रतिनिधींनी जन आक्रोश मोर्चात व्यक्त होतांना संतोष देशमुख हत्येच्या संदर्भातील गोष्टी बोलल्या पाहिजेत. प्राजक्ता माळीचं नाव घेणं, आडनावांच्या याद्या वाचून दाखवणं, फिल्मी स्टाईलन डॉयलॉग बोलणं यामुळे देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य कमी होतं. सुरेश धस हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. तरीही ते सरकारमधील मंत्र्यांवर टीका करत आहे. फडणवीस सदनात सांगतात की, आम्ही कुणालाही सोडणार नाही. मात्र, धस हे फडणवीसांच्या वक्तव्यावरच आणि गृहखात्यावर संशय व्यक्त करत आहेत, याचा धसांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही का?, असा सवाल हाकेंनी केला.
Video : धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, फडणवीसांना अल्टिमेटम; बीड प्रकरणात जरांगेंनी उपसली तलवार
पुढं ते म्हणाले, राजकारण जरूर करावं. मात्र, एखाद्या जातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून हत्येला जातीय वळणं देणं, याला माझा विरोध आहे. धस यांनी निवडून आल्यावर आपल्या विजयी सभेत बोलतांना आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर टीका केली होती. पराभूत उमेदवार आडवं-तिडव बोलू शकतो. मात्र, निवडून आलेले धस निवडणूक निकालापासूनच स्वपक्षीय नेत्यांवर टीका करत आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून टार्गेट केलं जातं, असं ते म्हणाले. आता ते या हत्याला जातीय वळणं देत आहे, असा आरोपही हाकेंनी केला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जातीय वळणं दिलं जातंय. मात्र, धनंजय देशमुख यांनी सांगितलं की, संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाली. जातीय भावनेतून झाली नाही. मात्र, ही नेतेमंडळी राजकीय फायद्यासाठी या हत्येला वेगळं वळण देत आहेत. हे फक्त राजकारण करत आहेत. बीड जिल्ह्यात नुसतं राजकारण केलं जातंय. हे इथं आरोपीची जात शोधली जाते, पोलिस-अधिकाऱ्यांची जात शोधली जातेय, असं ते म्हणाले.
आता आम्हाला गिल्ट येतोय
पुढं ते म्हणाले, बीडमध्ये कोण सत्तेत आहे, तेच कळंत नाही. सुरेध धस हे विरोधी पक्ष नेत्यासारखे वागत आहे. ते कोणत्या पक्षाचे आहेत? कारण निवडून आल्यानंतर ते आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर टीका करत आहेत. फडणवीस साहेब, तुमच्याच पक्षाचा आमदार गृहखात्यावर प्रश्न उपस्थित करत आहे. आम्ही ओबीसींना भाजपला निवडून द्या म्हटलं, याचाच आता आम्हाला गिल्ट येतोय, असं हाके म्हणाले.
सुरेश धस भाजपच्या विचारधारेत कुठे बसतात?
फडणवीस साहेब, सुरेश धस यांनी महाराष्ट्रातील देवस्थानांच्या जमिनी हडपल्यात. तुमचा पक्ष काही धोरणांवर, तत्वावर प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही देशभर राजकारण करता. मात्र, त्यांचं रामचंद्राच्या नावावरील उतारे धस यांनी स्वत:च्या नावावर केले. फडणवीस साहेब, सुरेश धस भाजपच्या विचारधारेत कुठे बसतात? हे चेक करून घेतले पाहिजे, असंही हाके म्हणाले.