जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियांचा सपोर्ट, माझ्या घरावर रेकी; लक्ष्मण हाकेंचे गंभीर आरोप

Laxman Hake Says Sand mafia supports Manoj Jarange : जालन्यात (Jalna) वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू झालीय. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विलास खेडकवर देखील तडीपारीची कारवाई केलीय. यावरून आता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा सपोर्ट असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी […]

Manoj Jarange Laxman Hake

Manoj Jarange Laxman Hake

Laxman Hake Says Sand mafia supports Manoj Jarange : जालन्यात (Jalna) वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू झालीय. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विलास खेडकवर देखील तडीपारीची कारवाई केलीय. यावरून आता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा सपोर्ट असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी (Laxman Hake) केलीय.

इतकंच नव्हे तर मनोज जरांगे वापरत असलेली गाडी देखील वाळू माफियांची आहे, असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. वाळू माफियांच्या जीवावर आंदोलन उभं करून मनोज जरांगे ओबीसी आरक्षणात घुसण्याचा प्रयत्न करत असतील, तर हे खूप मोठं पातक या लोकांकडून घडलेलं आहे. फक्त वाळू माफिया म्हणूनच नव्हे तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांवर कठोर कारवाई मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी मागणी देखील हाकेंनी केलीय.

कर्जतमध्ये रंगणार अजिंक्यपद महाराष्ट्र केसरीचा थरार! जिल्हा तालीम संघाच्या वतीने रोहित पवारांना पत्र

या वाळू माफियाचा आका कोण आहे? याचा शोध घेतला पाहिजे, असं म्हणत हाकेंनी जरांगेंवर निशाणा साधलाय. गोदावरी नदीची चाळण करणाऱ्या वाळू माफियांना देवेंद्र फडणवीस यांनी वाळू काढायला, लोकप्रतिनिधींचे घर जाळायला, गोळीबार करायला, अंतरवाली सराटी किंवा दोन-तीन जिल्ह्यामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायला थोडीच सांगितलं होतं.

जरांगे पाटलांच्या मागे असणारे हे वाळू माफिया, गुंड फक्त वाळू पुरते मर्यादित नाहीत. तर बीड शहर जळत असताना त्यामागे कोण होतं? हे सुद्धा तपासला पाहिजे. या लोकांना मोक्का लावला पाहिजे, कारण हे सगळं संघटित आहे. ज्या ज्या लोकांनी, नेत्यांनी ओबीसींची बाजू मांडली. त्या लोकांवर याच माफियांनी चार ते पाच वेळा फिजिकल अटॅक केलेत. माझ्यावर हल्ला करणारे सुद्धा हेच लोक होते, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय.

अरे बापरे! 72 कोटींची संपत्ती केली थेट संजय दत्तच्या नावावर, कट्टर चाहत्याची नेमकी कहाणी काय?

गेवराई तालुक्यामधून येऊन त्यांनी तीन-चार दिवस माझ्या घराचे रेकी केली, याची सगळी माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडे आहे. आता सुरेश धस यांचा खरा जातीवादी चेहरा समोर आलाय. सुरेश धस ओबीसींच्या मतांवर निवडून येतात, त्यांच्याच विरोधात गरळ वागतात. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई करू नका, असं सुरेश धस म्हणून कसे शकतात? सुरेश धस यांच्या डोक्यावर खरंच इलाज करावा लागणार असल्याची टीका हाकेंनी केलीय.

यावेळी लक्ष्मण हाके म्हणाले की, पंकजा मुंडे एका मोठ्या पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्या आहेत. महाराष्ट्रात एका लढाऊ ओबीसी पक्षाची गरज आहे. ओबीसींचा विचार मांडणारा एक पक्ष तयार व्हावा, ही काळाची गरज आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलताना हाके म्हणाले की, उठ-सूट उपोषण करायचं? अरे हे काय लावलंय? जरांगे पाटलांनी आठवड्यातील दोन दिवस उपोषण करावं. त्यांच्या तब्येतीला ते सूट होणार आहे.

 

Exit mobile version