Legislative Council elections Marathwada Archana Patil vs Basavaraj Patil : विधानसभा निवडणुकीत (Legislative Council elections) मोठे यश मिळाल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राज्यात (Marathwada) पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका होत आहे. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय. विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान (Elections) होणार असून, या निवडणुकीसाठी इच्छुकांची मोठी रस्सीखेच सुरू आहे.
महायुतीत तणाव, भाजपच्या तीन जागांसाठी चुरस
या पाच जागांपैकी तीन जागा भाजपला, एक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ला (Ajit Pawar) आणि एक एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाच्या शिवसेनेला मिळणार आहे. मात्र, या जागांसाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. भाजपच्या ताब्यातील जागांसाठी अनेक दिग्गज इच्छुक आहेत. विशेषतः मराठवाड्यातील एका जागेसाठी दोन प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
विधान परिषदेत कोण-कोणाची जागा?
या निवडणुकीत भाजपचे प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, रमेश कराड, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर, आणि शिवसेनेचे आमशा पाडवी यांच्या जागा रिक्त होत आहेत. त्यामुळे नवीन उमेदवारांच्या निवडीसाठी भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी तब्बल 100 जण इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
भाजपच्या उमेदवारांसाठी दिल्ली दरबारी चर्चा सुरू
भाजपच्या वाट्याला आलेल्या तीन जागांसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. विदर्भातील प्रवीण दटके विधानसभेत गेल्याने त्यांच्या जागी विदर्भातून कोणाला संधी मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप जोशी यांना संधी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र, भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत माधव भंडारी, दादाराव केचे आणि अमरनाथ राजूरकर यांची नावे निश्चित झाली असल्याचे सूत्रांकडून कळते.
Video : औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली; ‘SRPF’ तैनात, बजरंग दलाच्या इशाऱ्यानंतर कारवाई
मराठवाड्यातील जागेसाठी दोन नावांमध्ये चुरस
भाजपच्या मराठवाड्यातील जागेसाठी लातूर अथवा धाराशिव जिल्ह्यातील एका उमेदवाराची निवड होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील भाजप नेते रमेश कराड यांच्या जागेसाठी लातूरच्या अर्चना पाटील-चाकुरकर आणि धाराशिवच्या बसवराज पाटील-मुरूमकर (Archana Patil and Basavaraj Patil) यांच्यात तीव्र स्पर्धा आहे.
1) अर्चना पाटील-चाकुरकर
अर्चना पाटील यांनी लातूर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांन किंचित फरकाने पराभव स्विकारावा लागला. विधानसभेसाठी त्यांना पक्षाने संधी दिली होती, त्यामुळे विधानपरिषदेसाठीही त्यांचे नाव दिल्लीपर्यंत चर्चेत आहे.
काँग्रेसच्या दारात रांगा लागणार; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्यावर अतुल लोंढे स्पष्टच बोलले
2) बसवराज पाटील-मुरूमकर
बसवराज पाटील हे धाराशिव जिल्ह्यातील माजी आमदार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता, मात्र विधानपरिषदेच्या संधीच्या अटीवर ते काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाचा निर्णय लवकरच
मराठवाड्यातील या दोन दिग्गज नेत्यांमध्ये कोणाला विधान परिषदेसाठी संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपच्या दिल्लीतील हायकमांडकडून अंतिम निर्णय घेतला जाणार असून, लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे.