Download App

Letsupp poll : महाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर.…? शिंदे- फडणवीस घरी जाणार…

Maharashtra politics : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे जातील आणि अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होती. शरद पवार यांच्या राजीनाम्याने अजित पवार यांचे बंड तात्पुरते थंड झाले होते. पण मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टातील सत्तासंघर्षाचा निकाल लागला आणि दहा महिन्यांपासून अस्थिर असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा मिळाला. आता शिंदे सरकार वाचल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भाजपमध्ये जाण्याची शक्यता देखील मावळली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने एकनाथ शिंदेंना हायसे वाटले असले तरी खरी परीक्षा जनतेच्या कोर्टात आहे. लेट्सअप मराठीने केलेल्या एका सर्वेक्षणात मात्र शिंदे-फडणवीस सरकारला धक्का बसला आहे.

‘कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आज निवडणुका झाल्यास कोण विजयी होईल?’ असा सवाल लेट्सअप पोल मध्ये विचारण्यात आला होता. गेल्या चोवीस तासात 75 हजार लोकांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये 77 टक्के लोकांनी महाविकास आघाडीच्या बाजून कौल दिला आहे. तर 23 टक्के लोकांनी शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा सत्तेत येईल असे आपले मत नोंदवले आहे. एका युजरने म्हटले की लोकसभेला आणि विधानसभेला दोन्हीकडे निकाल महाविकास आघाडीच्याच बाजुने लागेल. भाजपा आणि शिंदे गटाची खुपच दयनीय अवस्था होईल.

अजितदादांचा फोटो भाजपच्या बॅनरवर लावणाऱ्या ‘त्या’ नेत्याची हकालपट्टी

Letsupp Poll

यावर एका सोशल मिडीया युजरने म्हटले की काहीही झालं तरी ज्यांनी चांगलं काम केले आहे. त्यांना लोक पुन्हा जास्त मताधिक्याने निवडून देतील. ज्यांच्या दृष्टीने जे चांगल काम केले त्याला मत देईल. कर्नाटक व महाराष्ट्र अशी तुलना करता येणार नाही. दुसऱ्या एका युजरने लिहिले की सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा मान्य केले आहे की खरा आणि मुळ शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचाच विजय होईल.

दुष्काळात तेराव्या महिन्यासारखंच ठाकरेंचं सरकार होतं, फडणवीसांचा हल्लाबोल…

2024 मध्ये महाविकास आघाडी सरकारला येणार आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार होणार हे नक्की आहे. भाजपाला 50 जागांपेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे आणखी एकाने म्हटले आहे. दुसऱ्या एकाने म्हटले की भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातुन आपला बाडबिस्तरा बांधून इतर राज्यात जावं. महाराष्ट्रात त्यांचे काहीही काम नाही. महाराष्ट्राला त्यांची आवश्यकता नाही. त्यांनी गद्यारांना घेऊन जावे. त्यांची नितिमत्ता रसातळाला गेली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे यांचे उपकार ते विसरले आहेत. मराठी माणूस म्हणून कोणीही भाजपाला मत देऊ नये.

Tags

follow us