Download App

LetsUpp Poll : होय, शिवसेनेबरोबरील युतीचा निर्णय चुकलाच, पण भाजपकडे बोटही दाखविले!

  • Written By: Last Updated:

Maharashtra Politics: राज्यात 2019 ची विधानसभा निवडणूक भाजप व शिवसेनेने एकत्र लढली होती. भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपने शंभरहून अधिक जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर युतीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून जोरदार खटके उडाले. त्यानंतर नाराज उद्धव ठाकरे हे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर गेल्याने महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. त्यावरून भाजपचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करतात. आता भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यानी एका मुलाखतीत खळबळजनक वक्तव्य केले.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने केलेल्या युतीचा निर्णय ही एक चूकच होती, असे तावडे यांनी म्हटले आहे. काही जणांचे म्हणणे होते की युती करावी तर काही जण म्हणत होते की युती करू नये, पण मला वाटते की युती करण्याची काहीच गरज नव्हती, असे तावडे म्हणाले. शिवसेनेला दुय्यम भूमिका बजावणेही त्रासाचे होते. कोणत्याही जागावाटपात एक तरी जास्त जागा शिवसेनेला हवी होती, असे तावडे यांनी म्हटले आहे. भाजपने 2019 मध्ये शिवसेनेसोबत युती करून चूक केली हे विनोद तावडे यांचे मत योग्य का ? यावर लेट्सअप मराठीने एक पोल घेतला. त्यात गेल्या चोवीस तासांत 36 हजार वाचकांनी आपला सहभाग नोंदवला आहे. त्यातील 55 % टक्के वाचकांनी तावडे यांचे मत योग्य असल्याचे म्हटले आहे. तर 45 टक्के लोकांनी तावडे यांच्या मताशी असहमती दर्शविली आहे.


‘ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच मुख्यमंत्री’; भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरबाजीवर पटोलेंचे तिरकस उत्तर

तर यावर 162 जणांनी प्रतिक्रिया नोंदविली आहे. काहींनी शिवसेनेच्या बाजूने, तर काहींनी भाजपच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. भाजपची एक हाती सत्ता केव्हाच येणार नाही, युती केली म्हणून 105 जागा आल्या.

Odisha Train Accident : सिग्नल कायम ठेवला तर अपघात टळला असता…

आता तर 20-25 जागा येतील, तावडे एकदम शंभर टक्के बरोबर बोलले आहेत. अर्थात हे फक्त उद्धव यांच्याबाबत सत्य आहे. आता शिंदे यांच्यासोबत मैदानात उतरून पाहा म्हणजे किती उमेदवार निवडून येतील, शिवसेनेने भाजपबरोबर युती करून चूक केली. होय भारतीय जनता पक्षाचे मोठे नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया काही जणांनी नोंदविल्या आहेत.

काहींनी प्रतिक्रिया नोंदविताना विनोद तावडे यांनाही घेरले आहे. तावडे हे स्वतः निवडून येऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचे तिकीट कापण्यात आले. विनोद तावडे तुम्ही शिवसेनेत या, इथे स्पर्धा कमी आहे. त्यामुळे संधी मस्त आली आहे…विचार करा, असा सल्लाही काहींनी दिला आहे.

Tags

follow us