Devendra Fadnavis on Congress : लोकसभेसाठी (Lok Sabha Elections) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi) जागावाटपं निश्चित झालं. शिवसेना ठाकरे पक्ष 21, काँग्रेस 17 जागांवर आणि शरद पवार गट 10 जागांवर निवडणूक लढवणार आहे. यावरून कॉंग्रेसवर सातत्याने टीका होते. अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही (Devendra Fadnavis) कॉंग्रेसवर टीका केली.
शिवतारे मागे लागले तर सळो की पळो करून सोडतात, मी त्यांचं शत्रूत्व…; अजितदादांची मिश्किल टिप्पणी
आज भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. या सभेत बोलताना फडणवीसांनी कॉंग्रेसवर सडकून टीका केली. फडणवीस म्हणाले, काँग्रेस पक्षाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली आहे. जागावाटप होत असतं, एकमेकांच्या जागा एकमेंकांना मिळत असतात. पण, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची जागा जाहीर करून टाकली. पण, कॉंग्रेस पक्षाला त्याचा पत्ताच नाही. शरद पवारांनी भिवंडीची जागा जाहीर केली. मात्र, काँग्रेस पक्षाला त्याची खबरबात नाही. काँग्रेस पक्षाची नुसती फरफट सुरू आहे, अशी टीका फडणवीसांनी केली.
Vijay Shivtare : ‘बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार’
फडणवीस म्हणाले, कुणाचा पायपोस राहिला नाही. कॉंग्रेस पक्षाला नेता नाही, नीती नाही. मागच्या वेळेला त्यांची एक जागा आली होती, आता कॉंग्रेसला शून्यावर आणायचं काम आपल्याला करायचं आहे, असं आवाहन फडणवीसांनी केलं.
शरद पवारांवर टीका
मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात शरद पवार हे मोठे नेते होते. त्यांनी दहा वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रात किती विकास केला ? शरद पवार हे दिग्गज नेते आहेत, पण त्यांना महाराष्ट्राचा विकास करता आला नाही, अशा शब्दात फडणवीसांनी पवारांचा समाचार घेतला.
https://www.youtube.com/watch?v=517moLwSses
नकली शिवसेना, राष्ट्रवादी राज्याचं भलं करणार का?
शरद पवार यांच्यासारख्या मोठा नेता, ज्यांना महाराष्ट्रात अनेक वर्ष काम केलं. पण, त्यांनाही राज्याचा विकास करता आला नाही. आता नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी हे दोन अर्धे पक्ष आणि त्यांच्यासोबत जाऊन अर्धी झालेली कॉंग्रेस राज्याच्या विकासाच्या गप्पा मारत आहे. पण, या राज्याचा विकास ही तीनचाकी रिक्षा करू शकणार नाही. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे, असं अमित शाह म्हणाले.