Download App

फडणवीसांचे 50 दिवसांत सभांचे तुफानी शतक ! दोनशेच्या स्टाइक रेटने विरोधकांवर हल्लाबोल

फडणवीस यांनी 50 दिवसांमध्ये राज्यभरात तब्बल शंभरहून अधिक सभा घेतल्या आहेत. क्रिकेटच्या भाषेत देवेंद्र फडणवीसांचा सभांचा स्ट्राइक रेट दुप्पट

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Lok Sabha Election bjp leader Devendra Fadanvis public meeting Century : महाराष्ट्रात महायुतीने लोकसभेच्या (Lok Sabha Election) 45 जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. हे टार्गेट (लक्ष्य) गाठण्यासाठी महायुतीतील नेत्यांनी महाराष्ट्राभर पायाला भिंगरी लावली आहे. चौथ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. त्यानंतर पाचव्या टप्प्यासाठी जोरदार प्रचार सुरू आहे. महायुतीतील भाजपचे (BJP) नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी हे लक्ष्य गाठण्यासाठी सभा घेण्याचा एक विक्रमच केला आहे. फडणवीस यांनी 50 दिवसांमध्ये राज्यभरात तब्बल शंभरहून अधिक सभा घेतल्या आहेत. क्रिकेटच्या भाषेत देवेंद्र फडणवीसांचा सभांचा स्ट्राइक रेट हा दुप्पट आहे. त्यांच्या इतक्या सभा विरोधातील नेत्यांच्या, त्यांच्या पक्षातील नेत्यांच्या झालेल्या नाहीत. पाचव्या टप्प्यासाठी ते आणखी सभा घेतील. त्यांच्यासाठी आता मुंबईतील सहा जागा प्रतिष्ठेच्या आहे. काही ठिकाणी नेते फुटल्याने देवेंद्र फडणवीस यांना कसरत करावे लागली. परंतु फडणवीस ही राजकीय डावपेचात महाविकास आघाडीवर भारी ठरले आहेत.


माझंही 2019 ला तिकीट कापलं पण मी साथ दिली; “लेट्सअप चर्चेत” स्मिता वाघ थेट बोलल्या

राज्यातील लोकसभा निवडणुकीची घोषणा १६ मार्च रोजी झाली. त्यानंतरच्या काळात युतीतील सर्व पक्षांशी चर्चा, भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी विचारविमर्ष त्यांनी सुरू केला. केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य या नात्याने नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत सहभागी झाले. त्यानंतर 26 मार्चपासून फडणवीस यांनी राज्याचा दौरा सुरू केला. त्याचबरोबर राज्यातील महायुतीच्या नेत्यांशी ते सातत्याने चर्चा करत होते.
विदर्भामध्ये निवडणुकीचा पहिला टप्पा होता. गडचिरोलीमध्ये 26 मार्चला पहिली जाहीर सभा घेऊन देवेंद्र फडणवीस यांचा झंझावात सुरू झाला. महायुतीतील तीनही पक्षांच्या उमेदवारांचा निवडणूक अर्ज भरण्यासाठी जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी आपण संपूर्ण ताकदीनिशी त्यांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले आहे. या सर्व विजय संकल्प सभांना देवेंद्र फडणवीस प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. फडणवीस हे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांवर तुटून पडले.
देवेंद्र फडणवीस यांनी 26 मार्च ते 11 मे या सुमारे 45 दिवसांत दररोज साधारण दोन ते तीन सभा घेतल्या. काही ठिकाणी एकाच दिवशी त्यांनी चार सभा घेतल्या. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचे संपूर्ण नियोजन त्यांनी केले.

राऊत अन् ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका


विरोधकांना चोख प्रत्युत्तर

पंतप्रधानांच्या राज्यातील प्रत्येक सभेला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
सभांचा धडाका सुरू असताना देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत विरोधी पक्षाच्या आरोपांना चोख उत्तरे दिली. या 45 दिवसांच्या काळात देवेंद्र फडणवीस यांनी 60 पेक्षा जास्त वेळा पत्रकारांशी संवाद साधला. त्याचबरोबर विविध वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी वाहिन्या यांना दीर्घ मुलाखती देऊन महायुतीची बाजू भक्कमपणे मांडली. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात सभा घेताना देवेंद्र फडणवीस यांनी तेथील कार्यकर्त्यांशीही संवाद साधला.


जागा वाटपापासून ते उमेदवारांना ताकदही

महायुतीतील तीन पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात एकमेंकांविषयी नाराजी किंवा गैरसमज होते. हे गैरसमज संवाद घडवून आणून ते दूर करण्याचे कामही केले.
जाहीर सभांचा तोफखाना सुरू असताना विरोधकांची वाभाडी काढत असताना देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ५० दिवसांत मुत्सदेगिरीचेही दर्शन घडविले. महायुतीतील तीन पक्षांमध्ये जागावाटप असो की उमेदवारांची निवड यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची ठरली.


अडचणीत जागेवर चाणक्याची भूमिका

एखादी जागा अडचणीत आहे असे वाटल्यास तेथे स्वत: जाऊन त्यांनी बैठका घेतल्या. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक- निंबाळकर हे अडचणीत असल्याची चर्चा सुरू झाली होती. यावेळी फडणवीस यांनी शरद पवार गटाचे अभिजित पाटील यांना भाजपमध्ये आणले. त्यांच्या विठ्ठल परिवारातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. उमेदवार विजयी होण्यासाठी रणनिती आखली. तर काही ठिकाणी विरोधकांचे डावपेचही उलथून टाकले आहेत.

follow us

वेब स्टोरीज