राऊत अन् ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

राऊत अन् ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

Bawankule Criticism of Uddhav Thackeray Interview : शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांची संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नुकतीच सामनामध्ये मुलाखत घेतली. त्यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीसह देशातील राजकारणावर भाष्य केलं. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी जोरदार टीका केली आहे.

 

मॅनेज मुलाखत

यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली. तसंच, ही मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशा असल्याची खरमरीत टीका बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

 

आपलेच कर्मचारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील अनेक माध्यमांच्या संपादकांना मुलाखती देत असताना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी असलेल्या संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली असा थेट आरोप केला. ही मुलाखत म्हणजे ‘काळू बाळूचा तमाशा’ अशा शब्दांतही त्यांनी याची थट्टा केली आहे. तसंच, पाच प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर एक मुलाखत देऊन त्यांनी या प्रश्नांचीही उत्तरं द्यावीत असंही ते म्हणाले.

 

उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यावीत

1 दहशतवादी कसाबचं समर्थन करणाऱ्या काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय?
2 1993 च्या मुंबई बाँबस्फोटातील गुन्हेगार तुमच्या उमेदवाराच्या प्रचारात का होता?, हा देशद्रोही प्रचारात बघून तुम्हाला लाज वाटली नाही का?
3 सत्तेवर आल्यास हिंदुची संपत्ती मुस्लिमांना वाटण्याचा काँग्रेसचा मनसुबा आहे. त्यावर तुम्ही मूग गिळून गप्प का बसलात?
4. ⁠ राहुल गांधी आणि काँग्रेसचे चेलेचपाटे सातत्यानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतात त्याबद्दल तुम्ही गप्प का आहात?
5. उदयनिधी स्टॅलिन हा हिंदू धर्म संपवण्याची धमकी देतो आणि तुम्ही त्याच्या मांडीला मांडी लावून का बसला होता?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज