Balasaheb Thorat On Narendra Modi : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे मैदानात आहे. दोन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान, आज लंके यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची श्रीगोंद्यात जाहीर सभा झाली. या सभेत बोलताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला.
आम्ही ‘डंके की चोट पे’ संचालक आहोत; गुणरत्न सदावर्तेंनी नेमकं खरं काय ते सांगितलं…
लंके यांच्या प्रचारार्थ आज मविआची सभा झाली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे खासदार खासदार संजय राऊत आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. या सभेला संबोधित थोरात म्हणाले, निलेश लंके यांच्या अनेक प्रचारसभा पाहिलेल्या आहेत. निलेश लंके यांच्या सर्व सभांमध्ये करंट असतो. साधा लाईट लावायचा असेल तर 360 चा व्होल्टचा करंट लागतो. पण, तुमच्यात 3000 व्होल्टचा कंरट आहे. तीन हजार व्होल्टचा करंट असेल तर शॉक कसा असणार, जाळ होणार जाळं असं म्हणत थोरात म्हणाले.
Sonu Sood: सोनू सूदला मिळालं मोठं काम; ‘या’ सेलिब्रिटी मंडळींबरोबर करणार ‘कायद्या’चा सर्वे
आपला मोठा विजय होणार असून चक्रीवाद निर्माण झालंय. तुम्ही निवडणूक यशस्वीरितीन पुढं नेताय. पण, तुम्हाला अजून काळजी घ्यावी लागेल. आमची हवा आहे, चक्रीवादळ आहे, असं म्हणून चालणणार नाही. शेवटचं मत पडेपर्यंत काळजी घ्यावी लागले, असं थोरात म्हणाले.
ते म्हणाले, निलेश लंके यांनी आमदार म्हणून मतदारसंघात अहोरात्र काम केले. मनापासून त्यांनी काम केलं. निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात चांगले काम केले आहे. पंतप्रधानांच्या सर्व सभा फेल आहेत, ते काय बोलतात हे त्यांनाच कळत नाही, लोकांना त्यांचं ऐकावं वाटत नाही, असा टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला.
कांद्याची बाजारपेठ ठप्प आहे. कांद्याची निर्यातबंदी उठवली असं सांगितलं गेल. पण, एकाच ठिकाणाहून कांद्याची निर्यात होतेय. ते म्हणजे गुजरात. सध्या फक्त गुजरातसाठी निर्णय घेतले जातात. एवढचं काय तर सध्या आयपीएल सुरू आहे. तिथं रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार व्हायला हवा, तर तिथं हार्दिक पांड्या कर्णधार झाला आहे. त्यामुळं क्रिकेटवाले नाराज झाले आहे. कारण, तो गुजरातचा आहे , राजकारण ठीक आहे. पण, खेळातही गुजरात पाहायला लागला तर ही जनता तुम्हाला गुजरातलाच पाठवेल, असा इशारा थोरातांनी दिला.