Download App

महाविकास आघाडीचं भाजपसोबत 20 जागांवर फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी आरोप

  • Written By: Last Updated:

Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi : ऐन लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Elections) रणधुमाळी सुरू असतांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आताही त्यांनी एक सनसनाटी आरोप केला. महाविकास आघाडीने भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा फिक्स केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. कल्याण, बीड, बुलढाणा अशा काही मतदारसंघांची नावे घेत या जागा फिक्स केल्याचं आंबेडकर म्हणाले. त्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.

खुद्द बाबासाहेबही संविधान बदलू शकत नाहीत’; ‘संविधान बदलणार’ म्हणणाऱ्यांना PM मोदींची चपराक 

प्रकाश आंबेडकर हे आज चंद्रपुरात होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधतांना अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कल्याणची जागा एकनाथ शिंदे यांच्यासाठी सोडली आहे. राष्ट्रवादीने पाचवेळा निवडणुकीत पराभूत झालेल्या व्यक्तीला उमेदवारी देऊन पंकजा मुंडे यांच्यासाठी बीडची जागा सोडली आहे. अशा अनेक जागा आहेत. याचा नेमका अर्थ काय, याचा आपण विचार केला पाहिजे. नवा कार्यकर्ता, मतदारसंघात नवा उमेदवार सताना, त्याला डावलून नेहमीच पराभूत झालेल्या उमेदवारांनाच पुन्हा संधी देत आहोत. मी तुम्हाला वीस मतदारसंघांची नावे सांगू शकतो जिथे उमेदवारांची फिक्सिंग झालीये, असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केला.

“ईडीचे प्रयोग आता तरी थांबवा”; मुलाच्या ईडी चौकशीवर शिंदे गटाच्या नेत्याचा संताप 

ते पुढे म्हणाले की, राज्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या फॅक्टरचा कोणी विचार केला नाही. मराठा समाजातील गरीब मराठा वर्ग मनोज जरांगे यांचा आदर करतो.माझ्या अंदाजानुसार राज्यातील 30 टक्के मतदान हे जरांगेंच्या यांच्यानुसार होईल. दोन्ही युतींना मतदान करायचे नसल्याचे त्यांनी आधीच जाहीर केले आहे. अशा स्थितीत आगामी निवडणुकांमध्ये मोठी उलथापालथ होईल, असा विश्वासही आंबेडकरांनी व्यक्त केला.

संजय मंडलिकांवर आंबडेकरांची टीका
कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांवर टीका केल्यानं आंबेडकरांनी त्यांना चांगलंच फटकारलं. शाहू महाराज कोण आहे, त्यांचे कुटुंब कोण आहे, त्यांच्या जवळच्या कुटुंबातील माणसं कोण आहे, हे जगाने मान्य केलं. त्यामुळं त्यावर दोन गाढवांनी कमेंट केल्यावर आपण त्यावर कमेंट करावं, असं मला वाटत नाही, असा हल्लाच आंबेडकरांनी चढवला.

पार्टीलेस देश करण्याचा मोदींचा प्रयत्न
अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःचा पक्ष संपवायला निघाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण पंतप्रधान मोदी हे मोहन भागवतांना कधी भेटतही नाहीत. पार्टीलेस देश करण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न असल्याची टीका आंबेडकरांनी केली. हे अतिशय धोकादायक आहे, असंही आंबेडकर म्हणाले.

 

follow us