“ईडीचे प्रयोग आता तरी थांबवा”; मुलाच्या ईडी चौकशीवर शिंदे गटाच्या नेत्याचा संताप
Gajanan Kirtikar Criticized BJP : उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांची ईडी चौकशी सुरू आहे. खिचडी वितरणात झालेल्या घोटाळ्या प्रकरणात ही चौकशी सुरू आहे. यावरून अमोल किर्तीकर यांचे वडील शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर संतापले आहेत. प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना किर्तीकर यांनी ईडी कारवाईचा उल्लेख करत भाजपवर संताप व्यक्त केला. किर्तीकर म्हणाले, ईडीबद्दल माझे स्पष्ट मत आहे की आता ईडीचे प्रयोग करण्याची गरज नाही इतका भक्कम पाठिंबा भाजपला देशभरातून आहे. ईडीमुळे लोकांच्या मनातही चीड निर्माण झाली आहे. त्यामुळे आता तरी ईडीचे प्रयोग थांबले पाहिजेत. अमोल किर्तीकर यांच्यावरील ईडी कारवाईचा मला राग येतोय.
“वय झाल्याने गजानन किर्तीकर भ्रमिष्ट झालेत” : गद्दारीच्या टिकेनंतर रामदास कदम चवताळले
अमोल किर्तीकर किंवा सूरज चव्हाण त्या कंपनीचे भागीदार नाहीत. मालकही नाहीत. परंतु, कोरोना काळात त्यांनी जीवावर उदार होऊन काम केलं. त्या कंपनीचा तो व्यवसाय होता. त्यांना या कामात नफा मिळाला. नफा मिळाल्यानंतर ज्याला मानधन म्हणतात ते या दोघांना मिळालं. चेकच्या माध्यमातून ते पैसे बँकेत टाकले. यामध्ये मनी लाँड्रिंग नाही. यात घोटाळा झाला असं जे म्हटलं जातं ते साफ चुकीचं आहे.
याचा तपास ईडीने केला आहे. हा क्रिमिनल ऑफेन्स नाही. पण सतत बोलवायचं आता पर्वा त्याला बोलावले तेव्हाही तेच कागदपत्र तपासले आणि तेच प्रश्न विचारले. सतत घाबरवत राहायचे काम यांच्याकडून केले जात आहे. चौकशी संपली आहे तरी पुन्हा चौकशी केली जात आहे. म्हणून मी म्हटलं की आता ईडीचे हे प्रयोग बंद केले पाहिजेत असे किर्तीकर म्हणाले.
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? गोविंदाने स्पष्टच सांगितले
महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करू
महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी मी काम करून त्याला निवडून आणणार आहे. युतीतून मी खासदार झालोय याची मला जाणीव आहे. माझ्या कार्यकाळात युती धर्म पाळला गेला आहे. दहा वर्ष दिल्लीत असताना 370 कलम हटवले गेले, जीएसटी आणले राम मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले. आताची निवडणूक साहजिकच सनातन धर्मासाठी आहे. या धर्मावर होणारे आक्रमक या सगळ्या कालावधीत सनातन धर्मासाठी अत्यंत प्रामाणिकपणे मोदींनी काम केल्याचं मी पाहिलं आहे. मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत असेही किर्तीकर म्हणाले.