Download App

Loksabha Election : माझ्या गावात भावकीची निवडणूक..,; अजितदादांची टोलेबाजी!

Loksabha Election : काही जणांनी माझ्या गावात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election) गावकीची अन् भावकीची केली असल्याची टोलेबाजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलीयं. बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांचा तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्यावर बोलताना अजितदादांनी टोलेबाजी केलीयं. ते मंचरमध्ये आयोजित सभेत बोलत होते.

सांगलीच्या जागेचा वाद तापला : ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांची घोषणा होताच काँग्रेसचा तीळपापड

अजित पवार म्हणाले, लोकसभेची निवडणूक म्हणजे देशाचं धोरण ठरवणारी निवडणूक आहे, ही गावकीची अन् भावकीची निवडणूक नाही. काही जणांनी माझ्या मतदारसंघात ही निवडणूक भावकीची केली आहे. पण ही निवडणूक गावकीची अन् भावकीची नाही. उगच मी उठायचं अन् दुसऱ्याच्या गावात जायचं अरे तुला तिथं कोण विचारतं का? पहिलं गाव बघ तुझा मतदारसंघ बघ… तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला भावकीमुळे फार अनुभव आला असल्याचा टोलाच अजितदादांनी शरद पवार गटाला लगावला आहे.

Lok Sabha Election: आघाडीचा धर्म पाळला जात नाही; भिवंडी, सांगलीवरून पटोलेंनी कुणाला सुनावले?

तसेच आपल्यासोबत भावकी आहे की नाही हे बघावं लागत तर पुढचं जमतं. गावचे सरपंचपण आपण नसतो अन् सांगतो इकडं मतदान करा असं सांगत असतात. अन् गावचा सरपंच दुसऱ्याचं गावचा असतो, लोकं म्हणतात तुझं गाव आहे का रे तुझ्याबरोबर? या शब्दांत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार करणाऱ्यांचा समाचार घेतला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या समर्थनात अजित पवार यांच्या सख्ख्या भावजयी शर्मिला पवार मैदानात उतरल्या आहे. शर्मिला पवार यांनी अजितदादांविरोधात मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे.

‘राणेंना निवडून दिलं तर जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स’; केसरकरांच्या वक्तव्याने सामंतांना धडकी

डायलॉगबाजी चित्रपट अन् मालिकेतच ठीक…
आम्ही दुपारीच राष्ट्रवादीचा पहिला उमदेवार घोषित केला आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनिल तटकरे यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यानंतर आता शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे उमेदवार असल्याचं अजितदादांनी जाहीरपणे सांगितलं आहे. तसेच तुम्ही गहाळ बसू नका, कामाला लागा, समोरचा उमेदवार कामाला लागलायं
तो डॉयलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. डायलॉबाजी करणं चित्रपट, मालिकेत ठिक आहे. जनतेसमोर घाम गाळावा लागतो, काम करावं लागतं, घाम गाळण्याची ताकद शिवाजीरावांमध्ये असल्याचं अजित पवार यांनी कोल्हेंवर रोख धरुन म्हटलं आहे.

follow us