Download App

Loksabha Election : मनसेचे इंजिन महायुतीला जोडणार ? राज ठाकरे तातडीने दिल्लीला

  • Written By: Last Updated:
Image Credit: letsupp

Raj Thackerays MNS party will Join NDA: लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. त्यात आता राज्यातील महायुती आणखी मोठी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मनसे हा पक्ष महायुतीमध्ये म्हणजे एनडीए (NDA) आघाडी सहभागी होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे हे सोमवारी सायंकाळी तातडीने दिल्लीला रवाना झाले. महाराष्ट्रातील भाजपचे काही नेतेही दिल्लीत आहेत. हे नेते व राज ठाकरे यांची गृहमंत्री अमित शाह यांच्या घरी बैठक होणार आहे. त्या बैठकीनंतर राज ठाकरे हे आपला निर्णय जाहीर करणार आहेत. राज्यातील भाजपची नेत्यांनी राज ठाकरे यांच्याबरोबर बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुतीमधील सहभागी होतील असे बोलले जात आहे.

गल्लीपासून-दिल्लीपर्यंत 52 निवडणुका हरले, तरीही सोलापूरच्या ‘स्वामीं’चा फडणवीसांवर विश्वास

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवारीच दिल्लीत गेले आहे. त्यानंतर राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले आहेत. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे हे महायुतीमध्ये गेल्यास त्यांना दोन लोकसभा जागा दिल्या जाऊ शकतात. दक्षिण मुंबई आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ मनसेला हवे आहेत.

मुख्यमंत्र्यांचा ग्रीन सिग्नल
महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे) हाही महत्त्वाचा पक्ष आहे. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अनेकदा एकमेंकाना भेटलेले आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना बरोबर घेण्यास तयार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारपरिषदेत राज ठाकरे आमची विचारधारा मानणारे नेते आहेत. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

MIM चे तीन उमेदवार घोषित; छ. संभाजीनगरमधून पुन्हा जलील यांना संधी!

जागा वाटप तिढा कसा सुटणार ?
महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व भाजप असे महत्त्वाचे पक्ष आहेत. या पक्षांतील जागा वाटप अद्याप झालेले नाही. पण भाजपने राज्यातील पहिली लोकसभा उमेदवारांची वीस जणांची यादी जाहीर केली आहे. परंतु शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाहीत. त्याबाबत दिल्लीत बैठका होणार आहेत. राज ठाकरे यांना दोन जागा दिल्लीनंतर जागा वाटपाबाबत आणखी तिढा वाढण्याची शक्यता आहे. कारण शिर्डीचा जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. येथून शिवसेनचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. त्यामुळे जागा वाटपाबाबत आणखी तिढा वाढण्याची शक्यता आहे.

follow us

वेब स्टोरीज