MIM चे तीन उमेदवार घोषित; छ. संभाजीनगरमधून पुन्हा जलील यांना संधी!
Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकांचं (Loksabha Election 2024) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. निवडणुकीची घोषणा होताच एमआयएमकडून (MIM) लोकसभा निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. या तीन उमेदवारांमध्ये एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचाही समावेश आहे.
औरंगाबाद से @imtiaz_jaleel, किशनगंज से @Akhtaruliman5 चुनाव लड़ेंगे और हैदराबाद से इंशाअल्लाह पार्टी मुझे टिकट देगीpic.twitter.com/aPFUb0gZBy
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) March 18, 2024
लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपकडून उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. तर अद्याप महाविकास आघाडीकडून जागावाटपावर चर्चा सुरु असून उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. अशातच आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस सुरु असतानाच एमआयएमने उडी घेतली आहे. छत्रपती संभाजीनगरमधून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. जलील हे 2019 च्या निवडणुकीत वंचित-एमआयएमच्या तिकीटावरुन विजयी झाले होते. जलील यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा दारुण पराभव केला होता.
बारामतीतील नमो रोजगार मेळावा एक जुमला होता; सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका
छत्रपती संभाजीनगर वगळता एमआयएमकडून आणखी दोन जागेवर उमेदवार देण्यात आले आहेत. बिहारमधील किशनजंगमधून बिहारचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान तर हैद्राबादेतून खुद्द असदुद्दीन ओवेसी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. एमआयएम पक्षाकडून देशातील बिहार, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातही उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचं ओवेसी यांनी स्पष्ट केलं आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेंतर्गत शिक्षक भरती सुरू, एकूण 327 जागांसाठी मागवले अर्ज
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जलील यांनी महाराष्ट्रात एमआयएम पक्ष 6 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं होतं. राज्यातील नांदेड, धुळे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, तर विदर्भातील एका मतदारसंघात एमआयएम उमेदवार उभे करणार आहे. तर देशातील इतर राज्यातील मतदारसंघातही उमेदवार देण्यात येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आहे.