Download App

नकली सेनेचा वचननामा नसून ‘यूटर्ननामा’, जनता फसवाफसवीला भुलणार नाही; बावनकुळेंचे टीकास्त्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) टीका केली. उबाठाचा 'वचननामा' नसून 'यूटर्ननामा' असल्याचं ते म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Chandrasekhar Bawankule On UBT Manifesto : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आज जाहीरनामा (UBT Manifesto) प्रसिध्द करण्यात आला. या जाहीरनाम्याला ठाकरे गटाने वचननामा म्हटलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत हा जाहीरनामा जाहीर केला. दरम्यान, ठाकरे गटाने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी (Chandrasekhar Bawankule) टीका केली. उबाठाचा ‘वचननामा’ नसून ‘यूटर्ननामा’ असल्याचं बावनकुळे म्हणाले.

वर्षा गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून निवडणूक लढणार 

कोराडी (नागपूर) येथे बावनकुळेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. बावनकुळे म्हणाले, नकली सेनेचा आज प्रकाशित झालेला वचननामा नसून ‘यूटर्ननामा’ आहे. काँग्रेस आणि तुकडे तुकडे गॅंगचा अजेंडा पुढे रेटण्याचं दुर्दैवी काम उद्धव ठाकरेंना करावं लागतंय. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या वचननाम्यात वचक होता. आज मात्र उबाठाच्या ‘यूर्टननाम्या‘त फसवाफसवी असल्याची टीका केली.

काँग्रेसला पुन्हा धक्का, राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रा करणारा नेता भाजपमध्ये 

बावनकुळे म्हणाले, ज्यांची ओळख खंडणीखोर आणि १०० कोटी वसुली रॅकेट चालवणारे म्हणून आहे, आज ते म्हणतात- आम्ही लूट थांबवू. अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात ज्यांनी शेतकऱ्यांनी कवडीही दिली नाही, फक्त घरात बसून राहिले, ते म्हणतात- कर्जमुक्ती देऊ. उद्धव ठाकरे किती यूटर्न घेणार? महाराष्ट्रातील सुज्ञ जनता तुमच्या फसवाफसवीच्या यूर्टननाम्याला भुलणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पवारांचा ‘शपथनामा’ म्हणजे शुद्ध फसवणूक!
यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यावरही टीका केली. शरद पवार यांनी त्यांच्या उरल्या सुरल्या पक्षाचा ‘शपथनामा’ नावाचा जाहीरनामा ही जगातील सर्वात मोठी फसवणूक आहे. ते जनतेला मूर्ख समजत आहेत. शरद पवार साहेबांचा शपथनामा हा खंजीर खुपसण्याचा नामा आहे, अशी टीका बावनकुळेंनी केली.

पुढं बोलतांना ते म्हणाले, शरद पवार यांच्या या जाहीरनाम्यावर एकही मत मिळणार नाही. जेव्हा-जेव्हा शरद पवार सत्तेवर होते, तेव्हा-तेव्हा त्यांनी केवळ सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता यासाठी राजकारण केले, अशी टीका बावनकुळेंनी केली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृवात्वात जो जाहीरनामा, वचननामा जाहीर केला आहे, त्यातून राष्ट्र कल्याण आणि देश कल्याण साधले जाणार असल्याचं बावनकुळे म्हणाले.

follow us