MLA Narendra Bhondekar: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) तोंडावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. जागावाटपावरून महायुती आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) यांच्यातील संघर्ष तीव्र होत आहे. आता हाच धागा पकडून आता विदर्भातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आधी भाजपला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात. विदर्भाची सीट विकून त्यांना पाहिजे ती मुंबईची सीट मिळवात, असा घणाघाती आरोप नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar:)यांनी केला.
Lok Sabha Elections 2024 : कॉंग्रेस उमेदवारांची सहावी यादी जाहीर! कुठं, कोणाला संधी?
विदर्भात ठाकरे गटाच्या अनेक जागांवर महाविकास आघाडीतून कॉंग्रेसने दावा केला. त्यावरून भोंडेकर यांनी ठाकरेंवर टीका केली. ते म्हणाले, ठाकरे गटाकडून गेल्या अनेक वर्षांपासून विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. यापूर्वी शिवसेनेची भाजपशी युती असताना ते भाजपच्या मर्जीनुसार जागा देत असत आणि घेत असत, हे आपण अनेकदा अनुभवले आहे. रामटेक ही सीट अजूनही शिवसेनेची पारंपरिक सीट आहे. उद्धव ठाकरेंना शिवसैनिकांना न्याय द्यायचा असेल तर त्यांनी त्या जागेवरून निवडणूक लढवायला हवी होती. मात्र, रामटेकची जागा काँग्रेसला देण्यात आली. पूर्व विदर्भात एकही सीट ठेवलेली नाही, सर्व सीट देऊन टाकल्या, असा दावा भोडेंकर यांनी केला.
फडणवीसांनी एका दिवसात सेट केलं पाच जागांवरचं राजकारण… CM शिंदे अन् अजितदादाही खूश
पुढं बोलतांना ते म्हणाले, 2019 च्या निवडणुकीतही असाच अनुभव आला. आमच्यासाठी एकही सीट ठेवली नाही. एक-दोन सीट घेतल्या, पण त्याही एक्स्पायरी डेटच्या होत्या. भाजप जे जे म्हणेल, तसं उद्धव ठाकरे करायचे. आता कॉंग्रेस जे म्हणतेय, तसंच उद्धव ठाकरे वागत आहे. हाच खरा चेहरा उद्धव ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरे आधी भाजपला सीट विकायचे, आता आता काँग्रेसला सीट विकतात. विदर्भातील सीट विकून मुंबईचे भले करून घेतात. मुंबईमध्ये त्यांना हवी तशी सीट मागून घेतात. हा शिवसैनिकांवर अन्याय आहे, असा आरोप भोंडकर यांनी केला.
दरम्यान, तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सहयोगी सदस्य म्हणून ठाकरे गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंविरोधात बंडखोरी करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडखोरीला शिवसेनेसोबतच काही अपक्ष आमदारांनीही शिंदे यांना साथ दिली. यामध्ये अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचाही समावेश होता.
ठाकरे विदर्भातील सीट विकून मुंबईचे भले करून घेतात. मुंबईमध्ये त्यांना हवी तशी सीट मागून घेतात, या भोंडेकर यांच्या आरोपाला उद्धव ठाकरे काय प्रत्युत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.