Download App

नाशिकमध्ये महायुतीमध्ये जागेचा तिढा सुटेना; शांतीगिरी महाराजांनीही घेतली आघाडी

नाशिक लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

  • Written By: Last Updated:

Shantigiri Maharaj’s nomination form filed : नाशिक लोकसभा (Nashik Lok Sabha) मतदारसंघाची निवडणूक २० मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) यांनी आज पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

अलीकडे घरफोडे खूप झाले, पण माझ्यात अन् देशमुख कुटुंबात अंतर पडणार नाही; मोहिते पाटलांनी दिला शब्द 

महायुतीकडून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी शांतीगिरी महाराज इच्छुक होते. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. आपण महायुतीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहोत. आपल्याला उमेदवारी दिल्यास आपला विजय निश्चित असल्याचा दावा शांतीगिरी महाराज यांनी केला आहे होता. मात्र शांतीगिरी महाराजांचे नाव मागे राहिले. त्यानंतर आता नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. आज पहिल्याच दिवशी दिंडोरितून मविआचा घटकपक्ष असलेल्या माकपचे जिवा पांडू गावित अर्ज दाखल केला. तर नाशिक मतदारसंघातून शांतीगिरी महाराज यांनीही अर्ज दाखल केला.

Sonu Sood: सोनू सूदने व्हॉट्सॲपला दिला मोलाचा सल्ला; म्हणाला, ‘सेवा अपग्रेड…’ 

अर्ज विक्री करण्याच्या पहिल्या दिवशी नाशिकमधून ८७ तर दिंडोरीतून ४० अर्जांची विक्री झाली. शांतीगिरी महाराज यांच्यासोबतच महायुचीचे इच्छुक उमेदवार खासदार हेमंत गोडसे, तसेच समता परिषदेचे दिलीप खैरे यांचेही अर्ज आले आहेत. तर जेपी गावित यांनीही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून इच्छुक म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळं मविआतील फुट आता चव्हाट्यावर आली आहे.

महायुतीकडून कोणाला उमेदवारी?
दरम्यान, नाशिकच्या जागेवर विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी दावा केला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. ही जागा राष्ट्रवादीला सुटणार असण्याची शक्यता आहेत. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? असा प्रश्न निर्माण होतो.

follow us