अलीकडे घरफोडे खूप झाले, पण माझ्यात अन् देशमुख कुटुंबात अंतर पडणार नाही; मोहिते पाटलांनी दिला शब्द

अलीकडे घरफोडे खूप झाले, पण माझ्यात अन् देशमुख कुटुंबात अंतर पडणार नाही; मोहिते पाटलांनी दिला शब्द

Dhairyashil Mohite Patil : माढा लोकसभेच (Madha Lok Sabha) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगोल्यात सभा झाली. या सभेला शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, उत्तम जानकर आदी नेते उपस्थित होते. या सभेला संबोधित करतांना धैर्यशील मोहिते पाटलांनी (Dhairyashil Mohite Patil) रणजितसिंह नाईक निंबाळकरांसह भाजपवर जोरदार जोरदार टीका केली. अलीकडे घरफोडे खूप झाले आहेत, अशा शब्दात त्यांनी निशाणा साधला.

नाशिकवाल्यांनो अस्वस्थ होऊ नका, प्रितमबद्दल ‘ते’ वक्तव्य गमतीनं केलं; पंकजा मुंडेचं स्पष्टीकरण 

अलीकडे घरफोडे खूप झाले
या सभेला धैर्यशील मोहित पाटील म्हणाले, अलीकडे घरफोडे खूप झाले आहेत. आणि ते घरमालकालाच सांगतात तुझं घर नाही. मोठ्या दादांनी आम्हाला सांगितलं की, पवार साहेबांच्या अडणीच्या काळात आपल्या कुटुंबाने ठामपणे त्यांच्या मागे उभ राहायचं. नशीब चांगलं म्हणून भाजपने मला उमेदवारी नाकारली. त्यानंतर 11 तारखेला मी पवार साहेबांना भेटलो आणि तेव्हा त्यांनी मला तयारीला लागण्याचे आदेश दिले, असं धैर्यशील माहिते पाटील म्हणाले.

पुढं बोलतांना ते म्हणाले, माझी खासदारी लढण्याचाची इच्छा आहे, हे मी अनेक दिवसांपासून सांगतोय. तेव्हा भाजपमध्ये होतो. त्यावेळी मौजमध्ये एक कार्यक्रम होतो. तिथल्या कार्यकर्त्यंना मला कार्यक्रमाला बोलावलं. त्या सभेत शेकापच्या कार्यकर्त्यांनी सर्वात आधी माझ्याकडे निवडणूक लढण्याविषयी आग्रह केला. तुम्ही निवडणूक लढलीच पाहिजे, असा शेकापच्या कार्यकर्त्यांनी मला केला.

मोहित पाटील आणि देशमुख कुटुंबात अंतर येणार नाही…
माझ्यात आणि देशमुख कुटुंबात कसं भाडणं लागलं, माळशिरसच्या जनतेत आणि सांगोला तालुक्यातल्या जनतेतं कसं भांडणं लागले, याचाच काहीजण प्रयत्न करत आहेत. कारण, आमच्यात भांडणं झालं की, आपण जिंकून येऊ अशी खात्री समोरच्या उमेदवाराला आहे. मात्र, मी आज जाहीरपणे सांगतो की, मोहित पाटील आणि देशमुख कुटुंबात केसभर सुध्दा अंतर येणार नाही, असं धैर्यशील मोहिते पाटलांनी सांगितलं.

सांगोल्यातील किसान रेल्वे होती. त्या रेल्वेनं शेतकऱ्यांचा माल दिल्लीला जात होता. मात्र, आता ती रेल्वे बंद पडली आहे. खासदारांना प्रश्न विचारला तर ते म्हणतात ती स्किम बंद पडली. अरे हे काय उत्तर झालं.. खासदाराने जनतेत मिसळायचं असंत, जनभावना समजून घ्यायची असते, लोकांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात आणि ते दिल्लीत मांडायचे असतात. मग ते सरकार आपल्या पक्षाचं असो की विरोधी पक्षाचं असो. पण, काही खासदार फक्त पक्षाचे असतात, ते जनतेची कधी होऊ शकत नाहीत, अशी टीका धैर्यशील मोहिते पाटलांनी केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube