ठाकरे गटाचे आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात, ८ दिवसांत…; शिरसाटांचा दावा
Sanjay Shirsat On Sanjay Nirupam : मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत काँग्रेसने (Congress) त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई सहा वर्षांसाठी असल्याचे पक्षाने स्पष्ट केलं होतं. याशिवाय प्रदेश काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतूनही निरुपम यांचं नाव वगळण्यात आले आहे. दरम्यान, आता निरुपम हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यावर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी भाष्य केलं.
लोकसभेच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! बबनराव घोलपांचा शिंदे गटात प्रवेश
सीएम शिंदे यांनी आज शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संजय शिरसाट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी संजय निरुपम यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता असल्याचे संजय शिरसाट यांनी सांगितलं. ते म्हणाले, निरुपम शिवसेनेत येत असतील तर त्यांची मागणी काय असेल? याबाबत त्यांनी अद्याप खुलासा केलेला नाही. तसेच शिवसेनेला पक्ष म्हणून त्यांना काय दिले जाईल, हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे या संदर्भातील सर्व माहिती योग्य वेळी समोर येईल. संजय निरुपम यांच्यासह उद्धव ठाकरे गटाचे अनेक आमदार आणि महाआघाडीचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असा दावा शिरसाट यांनी केला.
बबनदादा, संजयमामा, कल्याणराव अन् परिचारक फडणवीसांच्या बंगल्यावर : मोहिते पाटील चेकमेट होणार?
येत्या आठ दिवसांत महाविकास आघाडीला एकामागून एक अनेक धक्के बसतील, असेही संजय शिरसाट म्हणाले.
यावेळी बोलतांना त्यांनी एकनाथ खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, एकनाथ खडसेंना आपला पक्ष फक्त आपलाच आहे, हे लक्षात आले असावे, त्यामुळे ते पुन्हा भारतीय जनता पक्षात येत आहेत. एकनाथ खडसे जर महायुतीसोबत परत आले तर त्यामुळं कोणत्याच पक्षातील कोणाही नाराज होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. झाला तर खडसेंमुळं महायुतीला फायदाच होईल, असं शिरसाट म्हणाले.
आज उद्या जागावाटपाचा तिढा सुटणार
ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत महायुतीच्या जागावाटपात नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणच्या जागा शिवसेनेला मिळाल्या पाहिजे, अशी आग्रही मागणी आजच्या बैठकीत केली. या जागांचा आज-उद्या तिढा सुटेल, असा विश्वास शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.