Download App

म्हातारं लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय; सदाभाऊंचा पवारांवर गावरान तडका

"हे म्हातारं लय खडूस. तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय. दादाच्या लक्षात आल्याने ते महायुतीसोबत आले असं सदाभाऊ खोत म्हणाले.

  • Written By: Last Updated:

Sadabhau Khot:  निवडणुकीच्या रणसंग्रामात काही नेत्यांची भाषणं ऐकण्यासारखी असतात. यामध्ये त्यांच्या भाषेचा लहेजा, त्यातील बोली शब्द जितके अर्थपूर्ण तिककेच खळखळून हसवणारेही असतात. (Sharad Pawar) राजकीय नेत्यांमध्ये सदाभाऊ खोत हे आपल्या भाषाशैलीसाठी ओळखले जातात. त्यांचा बोली भाषेतील बोलण्याचा लहेजा कायम ऐकण्यासारखा असतो. माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी जोरदार फटकेबाजी केली. यावेळी, त्यांनी (Ajit Pawar) अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधांवर मिश्कील भाषेत शब्दफेक केल्याने सभेत चांगलाच हशा पिकला होता.

 

Devendra Fadnavis: माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित जलसिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावा

प्रपंच कधी करायचा?

“हे म्हातारं लय खडूस हाय, तिजोरीची किल्ली कंबरेला लावून फिरतय, अजित दादा किल्लीकडं बघून बघून म्हातारं झालं, दादाच्या लक्षात आलं की आता हे म्हातारं काय किल्ली देत नाय, त्यामुळं आता दादा किल्लीला लोंबकळत म्हणतय ही किल्ली तोडल्याशिवाय शांत बसणार नाय” अशा शब्दात  सदाभाऊ खोत यांनी दोन्ही अजित पवार आणि शरद पवार यांच्या राजकीय संबंधार टोलेबाजी केली. तसंच, आता आम्हाला प्रपंच करू द्या, आम्ही प्रपंच कधी करायचा म्हातारा झाल्यावर करायचा का?  असा प्रश्न उपस्थित करून खोत म्हणाले हा प्रपंच करण्यासाठी दादा महायुतीमध्ये आले.

 

सध्या त्यांचा धंदाच हा आहे

ही लढाई खऱ्या अर्थाने प्रस्थापित विरुद्ध विस्थापित, वाडा विरुद्ध गावगाडा अशी आहे. तसंच, या मतदारसंघात शरद पवारांविषयी अनेक गोष्टी ऐकायला येतात. त्यांच वय 84 असल्यामुळे ते आता 84 सभा घेणार आहेत असं बोललं जातय. मात्र, तुम्ही मला सांगा त्यांना काय काम आहे? त्यांना म्हशी वळायच्या आहेत का? की जनावारांना पाणी पाजायचय? सध्या त्यांचा धंदाच हा आहे, अशी टीका पवारांवर करत या वयात देखील आमच्या सारख्यांना संधी दिली जात नाही, अशा शब्दांत खोत यांनी आपली राजकीय खंत व्यक्त केली.

 

राहुलला आमचं घड्याळ हाती घ्यायला सांगा, उद्या मंत्री करतो, भरसभेत अजित पवारांची राहुल कुलांना मोठी ऑफर

शरद पवारांचे वय कायमच चर्चेत

गेली अनेक दिवसांपासून शरद पवार यांच्या वयाची चर्चा सुरू आहे. या ना त्या कारणाने पवारांच्या वयाचा मुद्दा समोर येत असतो. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर या चर्चेने अधिक जोर धरला. पक्षात फूट पडल्यानंतर कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावर टीका केली होती. त्यानंतर हा मुद्दा कायम पुढे येत राहिला. अजित पवार यांनी तर शरद पवारांनी आता आराम करावा आणि आम्हाला मार्गदर्शन करावं असाही मुद्दा उपस्थित केला होता. आजही ते अनेकदा असं म्हणत असतात. मात्र, पवारांनी यावर कायम “माझं तुम्ही आणखी काय पाहिल” असं म्हणत यांना जोरदार प्रतिउत्तर दिलेलं आहे.

follow us