Maha Vikas Aghadi formula, Vidhan Parishad Election 2026 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) सर्व जागा महाविकास आघाडी लढणार आहे. तिन्ही पक्षांच्या जागा वाटप निश्चित झाले आहे. काँग्रेस (congress) सर्वाधिक 8 जागा लढणार आहे. तर उद्धव ठाकरे गट चार जागा लढणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला तीन जागा देण्यात आल्या आहेत. दोन जागांबाबत अद्याप तिढा सुटलेला नाही.
Liquor Poisoning : पुण्यात विषारी दारूने मृत्युचं तांडव; मेथनॉल शरीरात गेल्यावर नेमकं काय होतं?
विधानपरिषदेच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरे गटाचे नेते खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे, आमदार मिलिंद नार्वेकर , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई अध्यक्ष माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे उपस्थित होते.
काँग्रेस चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया , अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, लातूर-धाराशिव-बीड, नागपूर (पोटनिवडणूक) या आठ ठिकाणी उमेदवार देणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग-रायगड, जळगाव, परभणी-हिंगोली, संभाजीनगर या चार ठिकाणी उद्धव ठाकरे यांची शिवसेना उमेदवार देणार आहे. तर शरद पवार यांची राष्ट्रवादी पुणे, ठाणे, सातारा-सांगली या ठिकाणी उमेदवार देणार आहे.
या दोन जागांवर तिन्ही पक्षांचा दावा
नांदेड, नाशिक या दोन्ही जागांवर तिन्ही पक्षाने दावा ठोकला आहे. त्यामुळे या जागेवरील तोडगा लवकर काढला जाईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काढला आहे.
सपकाळांचा भाजपवर गंभीर आरोप
भाजपच्या घोडेबाजाराला न जुमनता लोकशाही वाचविण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत वारेमाप पैसा खर्च होत आहे. बॅगा, ट्रकचे ट्रक पैसे वाटले जाणार आहेत. पैसा फेक तमाशा देख अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी मतदारांना पाच लाख रुपये अडव्हान्स दिले आहेत. सत्ताधारी विरोधातील, सत्ताधारी मित्र पक्षाचे मतदार पळवत आहे. स्वत:च्या मतदारांना पैसे दिले जात आहे. घोडेबाजारत बाप बडा न भैया सपसे बडा रुपया अशी परिस्थिती असल्याचा गंभीर आरोप सपकाळ यांनी केला आहे.
