‘माझ्या घराचा इश्यू केला, तुमच्या दोन एकरातल्या घराचं काय?’ शिंदेंनी रोहित पवारांकडे हिशोबच मागितला

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच […]

Lok Sabha 2024 : रोहित पवारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार; शिंदेंनी मोठा शिलेदार फोडला

Lok Sabha 2024 : रोहित पवारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला खिंडार; शिंदेंनी मोठा शिलेदार फोडला

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्यात एमआयडीसी आणि कर्जत एसटी डेपोच्या मुद्द्यावर सुरू झालेला आणखीच चिघळला आहे. याला कारण ठरले ते रोहित पवार यांनी पीएम मोदींना धाडलेले पत्र. या पत्रामुळे दोघांत नवा वाद सुरू झाला. आमदार राम शिंदे यांनीही आक्रमक होत आमदार पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिले. तसेच रोहित पवार यांची संपत्ती गेल्या तीन वर्षात किती आणि कशी वाढली, याचा हिशोबच शिंदे यांनी विचारला.

राम शिंदे यांनी आज नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. मागील विधानसभा निवडणुकीत माझ्या घराचा खूप मोठा इश्यू केला. महाराष्ट्रात माझं घर गाजलं. दोन हजार स्क्वेअर फुटात घरं बांधलं. आता यांनी तर दोन एकरात घर बांधलंय. अर्ध्या एकरात बांधकाम आहे. याची सुद्धा चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी शिंदेंनी केली.

पालकमंत्रीपदावरून दोन दादांमध्ये समेट?; ध्वजारोहणासाठी अजितदादा कोल्हापुरात जाणार

माझा नातू मोठे उद्योग उभारेल

ते म्हणतात मी खूप मोठे धंदे करतो. आता तुमचे आजोबा चार वेळेस मुख्यमंत्री. तुमचे चुलते पाच वेळेस उपमुख्यमंत्री. आता आमच्या बापानं सालं घातली. मी आमदार झालोय, मंत्री झालोय. माझा नातू मोठ मोठे उद्योग उभारेल ना. तरी ते तुमचे चुलत आजोबा आणि चुलत चुलते आहेत. माझा सख्खा नातू हे उद्योग पुढील काळात उभारेल.

आता उद्योगमंत्र्यांनीच चौकशी करावी

पाटेगाव खंडाळा येथेच एमआयडीसी व्हावी हा अट्टाहास रोहित पवार फक्त नीरव मोदीची जमीन मिळण्यासाठीच करत आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला. एमआयडीसीच्या जागेत नीरव मोदी याची जमीन कुणी समाविष्ट केली? कुणाच्या काळात समाविष्ट झाली?, कुणी त्याच्याशी संधान साधले?, कोणाचे कॉल त्यांना झाले? याची चौकशी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहिजे, अशी मागणी राम शिंदे यांनी केली.

कर्जत-जामखेडकरांच्या मनात काय? राम शिंदेंनी एकाच वाक्यात सांगून टाकलं

तीन वर्षात किती गुंठे अन् किती एकर जमीन घेतली ते सांगा

मी चॅलेंज केलं होतं माझी एकही गुंठा जमीन कर्जतमध्ये नाही. आता या प्रश्नाचं उत्तर कुणी द्यायचं. तुम्ही तीन वर्षात किती गुंठे, किती एकर अन् किती जमा केले हे सांगायला पाहिजे की नाही. गोरगरीबांच्या मागासवर्गीयांच्या सोसायट्यांवर सरकारचा शिक्का लागला, कशासाठी लागला हे त्यांनी सांगायला पाहिजे की नाही. राम शिंदेच्या नावावर एकरभराचा उतारा काढून दाखवा. नाही केलं आम्ही. तुम्ही इतक्या लवकर हे सगळं कसं केलं हे त्यांनी सांगायला पाहिजे.

Exit mobile version