Ajit pawar replies Devendra Fadnavis : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांनी मोठा निर्णय जाहीर केला. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची निवड जाहीर केली. त्यानंतर या निर्णयावर विरोधी पक्ष भाजपाच्या नेत्यांनी तिरकस प्रतिक्रिया दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही या निर्णयावर प्रतिक्रिया देत ही निव्वळ धूळफेक असल्याचे म्हटले. त्यांच्या याच प्रतिक्रियेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अत्यंत संयमी शब्दांत प्रत्युत्तर दिले.
कार्यकारी अध्यक्ष झाल्यानंतर सुप्रिया सुळे कोणाला रिपोर्टिंग करणार? थेट दिले उत्तर
अजित पवार आज साताऱ्यात होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर मते व्यक्त केली. पत्रकारांनी त्यांना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारला. त्यावर पवार म्हणाले, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे. भाकरी फिरवली कुणी सांगितलं तर मीडियानं सांगितलं. मी बघत होतो. मी वेगवेगळ्या चॅनलच्या बातम्या पाहिल्या. तेव्हा भाकरी फिरवली, भाकरी फिरवली असं म्हटलात की नाही. पवार साहेब काल काही म्हटले भाकरी फिरवली म्हणून. तर नाही म्हणाले. मीडियानं ते चालवलं.
देवेंद्र फडणवीस एका राष्ट्रीय पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांनी काय म्हणावं हा त्यांचा अधिकार आहे. भाजपनं काय करावं हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे तसं राष्ट्रवादीनं काय करावं हा राष्ट्रवादीचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीची कार्यकारिणी, आमदार, खासदार त्याबद्दलचा निर्णय घेतील. आमची विचारधारा आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. टीकाटिप्पणी करणे हे त्यांचं काम आहे त्यामुळे ते बोलतात. पण, त्याकडे फार महत्व दिलं पाहिजे असं मला काही वाटत नाही.
Supriya Sule : होय, ही घराणेशाहीच आहे पण.. सुप्रिया सुळेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर
काय म्हणाले होते फडणवीस?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयावर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, याला भाकरी फिरवणे म्हणत नाहीत ही तर धूळफेक आहे. हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे ते पाहून घेतील.