Maharashtra Assembly Election 2024 Results : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) शिवसेना नेमकी कोणाची? हा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. आज जनतेने मात्र आपला कौल दिला आहे. मतदारांनी शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय. आतापर्यंतच्या कलानुसार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला मताधिक्य मिळाल्याचं दिसतंय. जनतेने महायुतीला कौल दिल्याचं दिसत आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची पिछेहाट होताना दिसत आहे. आतापर्यंतच्या मतमोजणीत एकनाथ शिंदे यांची सरशी होताना दिसत आहेत.
साडे अकरा वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, महायुतीतील घटक पक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना 55 जागांवर आघाडीवर दिसत आहे. तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना 18 जागांवरच आघाडीवर दिसतेय. महत्वाचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महायुतीतील क्रमांक दोनचा मोठा पक्ष ठरत असल्याचं चित्र आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना महाविकास आघाडीतील सर्वात लहान पक्ष ठरताना दिसतोय.
Parli Vidhan Sabha Result : परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; तब्बल 50 हजारांनी मिळवला विजय
आतापर्यंत काय कल आलेत?
आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार महायुती 288 पैकी 221 जागांवर आघाडीवर आहे. यामध्ये भाजप 131 जागांवर आघाडीवर आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 55 जागांवर आघाडीवर आहे. तो राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचा पक्ष 35 जागांवर आघाडीवर आहे. तो राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरताना दिसत आहे.
श्रीवर्धनमधून मोठी बातमी! आदिती तटकरे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल
महाविकास आघाडी केवळ 55 जागांवर आघाडीवर दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 20 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 17 तर शिवसेना ठाकरे गट 18 जागांसह आघाडीवर आहे.कॉंग्रेस हा महायुतीमधील सर्वात मोठा घटक पक्ष ठरत आहे. कोकणात देखील महायुतीचीच हवा असल्याचं दिसतंय. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला विधानसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला असल्याचं दिसत आहे.