प्रशांत गोडसे
लेटस्अप प्रतिनिधी
Maharashtra Politics News : महाराष्ट्र राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) () महायुतीला भरघोस यश मिळाले असून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरलेला आहे. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री पदासाठी सर्वात पुढे नाव भाजपा नेते माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाला सर्वात जास्त पसंती दिल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे की अजित पवार विराजमान होतील यावर आता कार्यकर्ते सामान्य जनता आपापला अंदाज बांधताना दिसत आहेत. दिल्लीतील भाजपाचे नेते मास्टर स्ट्रोक देऊन राज्यात कोण मुख्यमंत्री करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाचे श्रेय महायुती राज्यातील जनतेला देत आहे. तर दुसऱ्या बाजूला महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत आहे. 132 जागा मिळवून भाजपा महायुतीतील सर्वात मोठा पक्ष बनला असून भाजपाचा मुख्यमंत्री व्हावा आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावे, अशा प्रकारची अपेक्षा राज्यातील भाजपा कार्यकर्ते आणि नेते व्यक्त करीत आहेत. तशाच प्रकारची मागणी भाजपाचे राज्यातील नेते दिल्लीतील हाय कमांडकडे करीत आहे. पुढचा मुख्यमंत्री कोण या विषयाचा चर्चांना उधाण आलंय. लेट्सअप मराठीला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची माळ पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात पडणार असल्याचं समोर येत आहे.
मंत्रिपदासाठी महायुतीच्या आमदारांची रस्सीखेच! इच्छुकांचा आकडा वाढला, पुण्यातील यादी समोर
भाजपला मुख्यमंत्रिपदापासून दुर रहावं लागण्याची कारणे…
2019 साली पार पडलेल्या निवडणुकीत 105 जागा मिळवून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय खेळी केली होती. महाविकास आघाडीचा नवीन फॉर्मुला तयार करून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करत मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांना विराजमान केले होते. तब्बल अडीच वर्ष भाजपाला मुख्यमंत्री पदापासून महाविकास आघाडीने दूर ठेवले होते. त्यानंतर राज्यात भूकंप झाला. शिवसेना फुटली आणि नेते एकनाथ शिंदे भाजपासोबत आले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार निश्चित झालं होतं.
मात्र, ऐनवेळी भाजपाने मास्टरस्ट्रोक खेळत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदी बसविले. यावेळी मात्र, भाजपने मोठापणा दाखवत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची शिवसेनेला दिल्याचे बोलले जाते. एकंदरीत विचार करतात तब्बल पाच वर्षे भाजपा मुख्यमंत्री पदापासून दूर राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत रंगली. मात्र, बाजी मारली ती महाविकास आघाडीने. त्याचा परिपाक विधानसभा निवडणुकीत होऊ नये, यासाठी महायुतीकडून खबरदारी घेण्यात आली होती. मुख्यमंत्रिपदी कोण असणार? हा मुद्दा बाजूला सारून महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ आणि त्यानंतर याविषयी निर्णय घेऊ अशा प्रकारचा प्रचार विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान महायुतीकडून करण्यात आला तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदावरून काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेते मतदानाच्या दिवसापर्यंत संघर्ष पाहायला मिळाला.
सुरेश दुबेंच्या सुनेकडून बदला पूर्ण; कधीही न हरणाऱ्या हितेंद्र ठाकूरला अस्मान दाखवलं…
एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी मिळणार का?
राज्यात पुन्हा एकदा भाजपाने 132 जागा मिळवून महायुतीतील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. आत्तापर्यंतच्या राज्याच्या इतिहासानुसार युती असो किंवा आघाडी असो युतीधर्मानुसार ज्या पक्षाचे सर्वात जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री बनला आहे, तसा विचार केला तर मुख्यमंत्री भाजपाचा होईल. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती निवडणुकीला सामोरे गेली होती. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक पार पडणार आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा विचार करता एक वर्षासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशा देखील चर्चा रंगू लागल्या आहेत.
लाडक्या बहिणींचा भाऊ देवाभाऊ, मुख्यमंत्री बनणार?
महाराष्ट्रातील राजकारणात 2014 साली भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बनले होते. पाच वर्षे केलेल्या राज्यकारभारामुळे देवेंद्र फडणीस यांची महाराष्ट्रातच नव्हे तर केंद्रात देखील वेगळी छबी निर्माण झाली आहे. मात्र, 2019 साली भाजपाला दगा फटका झाला आणि अडीच वर्ष सत्तेपासून दूर राहावा लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पुन्हा एकदा राजकारणातील नवीन चाणक्य आणि कलियुगातील नवीन अभिमन्यू म्हणून ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहे. भाजपाला 132 जागा मिळाल्या असल्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपातील केंद्रातील, राज्यातील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देखील पसंती आहे. त्यांच्याच नावावर दिल्ली दरबारी शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडून समोर येत आहे. भाजपाचा मुख्यमंत्री झाला नाही तर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये वेगळा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे भाजपावर दबाव वाढत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागेल का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भाजपा मास्टरस्ट्रोक देणार?
महाराष्ट्राच्या राजकारणात पाच वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याचे रेकॉर्ड अजित पवार यांच्या नावावर आहे. अजित पवारांचे मुख्यमंत्रिपदाचा स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी नेते करीत आहेत. एक वर्षांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडून भाजपा शिवसेनेच्या साथ देऊन उपमुख्यमंत्री बनले होते. लाडकी बहीण योजनेसाठी निधी उपलब्ध करून महायुतीतील विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यात त्यांचा देखील मोलाचा वाटा पाहायला मिळत आहे. त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपा आपला मास्टर स्ट्रोकचे हत्यार उपसत त्यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान पाच वर्षाच्या कार्यकाळात पहिल्या वर्षी करतात की दुसऱ्या वर्षी करतात हे पहावें लागणार आहे.
दरम्यान, लेट्सअप मराठीला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज्याच्या मुख्यमंत्रिपदी भाजपाचा चेहरा असणार आहे. मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी, चंद्रकांत पाटील की पंकजा मुंडे कोणाची वर्णी लागणार की पुन्हा भाजप मास्टरस्ट्रोक खेळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.