Download App

घड्याळाचे काटे फिरले! अजितदादांचा काँग्रेससह भाजपला धक्का, दोन माजी खासदारांसह आमदारही पक्षात

Zeeshan Siddique Join Ajit Pawar NCP : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. यातच अनेक नेते आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचं पाहायला मिळत आहेत. आज देखील झिशान सिद्दीकी, (Zeeshan Siddique) संजय काका पाटील आणि प्रतापराव चिखलीकर यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. पक्षाकडून त्यांना निवडणुकीचं तिकीट देखील दिलं जातंय. त्यामुळे आता हे तिन्ही नेते अजित पवार गटाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरत आहेत. यंदाची विधानसभा निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे, अशी चिन्हे दिसत आहेत.

बाबा सिद्दिक यांचे पुत्र काँग्रेसचे माजी आमदार झीशान सिद्दिकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केलाय. ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर वांद्रे पूर्वमधून विधानसभा निवडणूक लढणार (Ajit Pawar NCP) आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार वरूण सरदेसाई यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. हा सामना लक्षवेधी ठरणार आहे. मातोश्री हा उद्धव ठाकरे यांचा बंगला याच मतदारसंघात येतो. झिशान सिद्दीकी कॉंग्रेसपक्षाचे आमदार होते, परंतु आज त्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसोबत होतमिळवणी केली आहे.

८५ चा फॉर्मुला अंतिम नाही; काँग्रेस १०० जागा लढवणार; वडेट्टीवारांचा दावा, काँग्रेस नेते दिल्लीला रवाना

आज भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय. माजी खासदार संजय काका पाटील (Sanjay Kaka Patil) आता तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार पक्षाकडून तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात रोहित पाटील यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे आता या मतदारसंघात संजय काका पाटील अन् रोहित पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे.

माहीम विधानसभा राज साहेबांना भेट देणार; पहिल्याच प्रचार सभेत अमित ठाकरे जोरदार भाषण

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका होत आहेत. विधानसभा निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Chikhalikar) अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. चिखलीकर यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गटाची नांदेडमध्ये ताकद वाढणार आहे, तर भाजपला मोठा धक्का बसतोय. प्रताप चिखलीकर मुंबईमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत.

follow us