Saroj Patil : राज्यात लोकसभा निवडणुकांची धामधूम (Lok Sabha Election) सुरू आहे. राज्यात पाच टप्प्यांत निवडणुका होणार आहेत. यंदा बारामती मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) निवडणूक सर्वाधिक चर्चेत आहे. कारण ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरची आहे. राष्ट्रवादीत आता दोन गट पडले आहेत. गट फुटला म्हणून कुटुंबात फूट पडलेली नाही. या राजकारणाचा पवार कुटुंबावर कोणताही परिणाम होणार नाही, असे ठाम वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बहिण सरोज पाटील (Saroj Patil) यांनी केले.
‘कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाही’; भावासाठी बहिण मैदानात, चंद्रकात पाटलांना उत्तर
सरोज पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात मोठा दावा केला. सरोजताई पाटील म्हणाल्या, पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. लोकांनी काळजी करू नये. उगाच गट फुटला, पवार कुटुंबात फूट पडली अशी चर्चा करून काहीच होणार नाही. निवडणुका होतील. ज्यांना निवडून यायचं ते येतील. आम्ही मात्र नेहमी राजकीय चपला बाहेर काढून घरात येतो. एनडी पाटील आणि शरद पवार तर दोन अत्यंत वेगळ्या विचारसणीचे नेते आहेत. तरी देखील आमच्या घरात कधीच राजकारण आलं नाही.
एनडी पाटील राजाराम बापूंविरुद्ध निवडणुकीत उभे होते त्यावेळी त्यांच्याकडे पैसे नव्हते. तेव्हा माझ्या आईने त्यांना प्रचारासाठी दहा हजार रुपये दिले होते, अशी एक आठवण सरोज पाटील यांनी सांगितली. राजकारणात एनडी पाटील शरद पवारांवर प्रखर टीका करायचे. शरद पवार काँग्रेस पक्षात होते तर आई मात्र शेतकरी कामगार पक्षात होत्या. डाव्या विचारसरणीचे लोक यायचे. यशवंतराव चव्हाणांसारखे ज्येष्ठ नेतेही यायचे परंतु या गोष्टींचा कधी घरावर परिणाम झाला नाही, असे सरोज पाटील म्हणाल्या.
बारामतीत कोण जिंकणार?
बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार कोण विजयी होणार असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर मी शिक्षिका आहे. माझं दोघींवरही प्रेम आहे असे सांगत या मुद्द्यावर आधिक भाष्य करणं त्यांनी टाळलं.