Download App

पंकजांच्या नेतृत्त्वाला शाहांचा कौल; वन टू वन चर्चेमुळे बीडमधील समीकरणं बदलणार

Pankaja Munde : पंकजा मुंडे, मागील काही दिवसांपासून भाजपात साईडलाईन झालेल्या नेत्या. भाजप नेत्यांकडून (Pankaja Munde) त्यांच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात घर करून होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत तरी त्यांना संधी मिळणार का? असा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्याने सगळं चित्रच बदललं आहे. याचं कारण म्हणजे, भाजपने नाराज नेत्यांना सोबत घेण्याचं नक्की केलं आहे. या अंतर्गत काल अमित शाह यांनी पंकजा मुंडेंबरोबर स्वतंत्र चर्चा केली.  मराठवाड्यातील स्थितीचा आढावा घेतला. याद्वारे शाह यांनी एकप्रकारे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाला कौल दिला. त्यामुळे पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

Pankaja Munde : व्यक्तिगत निर्णय सांगण्यासाठी नसतात, मी योग्य वेळ आल्यावर; पंकजांचा सूचक इशारा

गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी जळगावात जाहीर सभा घेतली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्येही सभा झाली. या सभेआधी पंकजा मुंडेंनी त्यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह यांनी पंकजा मुंडेंबरोबर स्वतंत्रपणे चर्चा केली. मराठवाड्यात सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला. तसेच जिंकण्याची क्षमता असलेलाच उमेदवार या निकषावर उमेदवार निश्चित करण्याचे निर्देश दिले. यानंतर पंकजा मुंडे यांची बीड लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी निश्चित झाली आहे.

तसं पाहिलं तर, मागील काही दिवसांपासून पंकजा मुंडे भाजपात पिछाडीवर पडल्या होत्या. राजयाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात विसंवादाच्या बातम्याही मध्यंतरी आल्या होत्या. राज्यसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळेल असेही सांगितले जात होते. कारण, ज्या इच्छुक उमेदवारांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती त्यात पंकजा मुंडे यांचंही नाव होतं. परंतु, त्यांना तिकीट मिळालं नाही, त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीत तरी त्यांना तिकीट मिळणार का, असा प्रश्न विचारला जात आहे.

पंकजा मुंडेंचा पुन्हा गेम; नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या चव्हाणांना मिळाले 147.79 कोटी  

त्यानंतर अमित शाह यांच्या दौऱ्यातील घडामोडींनंतर समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळणार का? भाजप नेतृत्वाने त्यांच्यासाठी काय निर्णय घेतला आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us

वेब स्टोरीज