पंकजा मुंडेंचा पुन्हा गेम; नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या चव्हाणांना मिळाले 147.79 कोटी

  • Written By: Published:
पंकजा मुंडेंचा पुन्हा गेम; नुकत्याच भाजपमध्ये आलेल्या चव्हाणांना मिळाले 147.79 कोटी

मुंबई : राज्य सहकारी बँकेने थकहमी पोटी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या साखर कारखान्याला सुमारे 147.79 कोटी रुपयांची रक्कम दिली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा हात सोडत कमळ हाती घेतलेल्या अशोक चव्हाणांना राज्यसभे पाठोपाठ आणखी एक लॉटरी लागली आहे. एवढेच नव्हे तर, अशोक चव्हाण यांच्यासह अजित पवार यांना पाठिंबा देणारे कल्याण काटे, अमरसिंह पंडित आणि प्रशांत काटे यांच्या साखर कारखान्यांनाही (Sugar Factory) आर्थिक मदत राज्य सरकारी बँकेकडून करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे नव्याने कमळ हाती घेतलेल्या नेत्यांवर राज्य सरकार मेहरबान असल्याचे चित्र समोर आले आहे. पण, स्वतःच्याच पक्षातील पंकजांच्या कारखान्याला मदत न झाल्याने पुन्हा त्या साईड लाईन झाल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. (Ashok Chavan Sugar Factory Get Financial Help)

पुणे महापालिकेचा यू-टर्न; निलेश राणेंची पावणेचार कोटींची थकबाकी 25 लाखात सेटल

संग्राम थोपटे, अशोक बापू पवार नाराज

पंकजा मुंडेंच्या कारखान्याशिवाय काँग्रेसचे संग्राम थोपटे आणि शरद पवार गटाचे अशोक बापू पवार यांच्या कारखान्यांना कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर, दुसरीकडे राज्य सहकारी बँकेने चव्हाणांसह सत्ताधारी वर्तुळाशी निगडीत 11 जणांनाही थकहमी पोटी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

चव्हाण यांच्या कारखान्यासह सोलापूर येथील धनाजीराव साठे यांच्या संत कुरूमदास सहकारी कारखान्याला 59.49 कोटींची मदत देऊ केली आहे. तसेच कल्याणराव काळे यांचा भाळवणी पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याला 146.32 कोटींची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

महायुतीचे 13 शिलेदार ठरले : मुंबईतील चार अन् जळगाव, रावेर मतदारसंघात धक्कादायक नावे?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखाने कोणते?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केलेले कारखान्यांमध्ये नांदेड येथील भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याला 147. 76 कोटी देण्यात आले आहे. या कारखान्याच्या व्यवस्थापन नुकतेच भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण पाहतात. चव्हाणांच्या कारखान्याशिवाय सोलापूर पाडसाळी येथील संत कुरूमदास सहकारी कारखान्याला 59.49 कोटींची आर्थिक मदत देण्यात आली असून, या कारखान्याचे व्यनस्थापन धनाजीराव साठे हे बघतात. वरील दोन सहकरा कारखान्याशिवाय भाळवणी पंढरपूर येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याला 146.32 कोटी देण्यात आले आहेत. या कारखान्याचे व्यवस्थापन कल्याणराव काळे बघतात.

याशिवाय इंदापूर भवानीनगर येथील प्रशांत काटे यांच्या छत्रपची सहकारी सारख कारखान्याला 128 कोटी तर, गेवराई बीड येथील अमरसिंह पंडित यांच्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याला 150 कोटींची मदत करण्यात आली आहे. माळशिरस येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शंकर सहकारी साखर कारखान्याला 113.42 कोटी, हर्षवर्धन पाटलांच्या इंदापूर येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याला 150 कोटी देण्यात आले आहे. तर, हर्षवर्धन पाटलांच्या निरा भिमा कारखान्यालादेखील 75 कोटी जाहीर झाले आहेत.

Manoj Jarange : “मला अटक तर करू द्या, लाट काय असते ते कळेल”; जरांगेंचा रोखठोक इशारा

अभिमन्यू पवार यांच्या लातूर येथील शेतकरी सहकारी कारखान्ययाला 50 कोटी. तर रावसाहेब दानवे यांच्या रामेश्वर सहकारी कारखान्याला 34.74 कोटींची मदत देण्यात आली आहे. तर, धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखक कारखान्याला 126.38 कोटी देण्यात आले आहेत. ही मतद बघता सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर सरकार मेहरबान असल्याचे चित्र असून, पंकजा मुंडेंच्या कारखान्याला कोणताही मदत जाहीर न झाल्याने त्या पुन्हा साईड लाईन झाल्याच्या चर्चांनी जोद धरला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube