‘सर्वच विरोधी पक्ष नेते सत्तेत; पुढचा नेता ब्लड ग्रुप चेक करून जाहीर करणार’; आघाडीतील गोंधळावर बावनकुळेंचा टोला

Chandrashekhar Bawankule : संशयाच्या वातावरणात विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता ठरेल असं मला वाटत नाही. कारण अनेकांना अशी भीती आहे की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाला करायचं. एकदा त्यांच्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप चेक करावा […]

Chandrashekhar Bawankule

chandrashekhar bawankule

Chandrashekhar Bawankule : संशयाच्या वातावरणात विरोधी पक्षनेता ठरू शकत नाही. कुणावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही. जोपर्यंत विश्वासाचं वातावरण होत नाही तोपर्यंत विरोधी पक्षनेता ठरेल असं मला वाटत नाही. कारण अनेकांना अशी भीती आहे की जो विरोधी पक्षनेता होतो तो सरकारी पक्षात उडी मारतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता कुणाला करायचं. एकदा त्यांच्या सगळ्यांचा ब्लड ग्रुप चेक करावा लागेल. तो झाल्यानंतर वर्ष दोन वर्षानंतर ते काहीतरी निर्णय घेतील, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधी पक्षांना लगावला.

फडणवीसांच्या वाढदिवशी भाजपाचा ‘लोकल कनेक्ट’; राज्यात ‘सेवा दिन’ साजरा करणार

बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले, काँग्रेसची स्थिती आज अशी आहे की त्यांचे सगळेच नेते आणि विधीमंडळातील सहकारी संभ्रमावस्थेत आहेत. संशयाचं वातावरण आहे. कोण कुठं कधी जाईल याची गॅरंटी कुणालाच नाही असं वातावरण सभागृहात आहे. त्यामुळे ते सभागृहात चर्चाही करत नाहीत. त्यांच्यात कुणाचाच ताळमेळ नाही. विधानसभेतले जे काही चार पाच नेते आहेत त्यांच्यातही संवाद नाही.

काँग्रेसनं लोकांना कन्फ्यूज केलं आणि मते घेतली

काँग्रेस पार्टीचं आयुष्य, त्यांचा विचार आणि त्यांची स्थिती ही अशीच आहे. जनतेला कन्फ्युज करून मतांचे राजकारण करणे. जनतेची सेवा करून काँग्रेसने कधीच आपला पक्ष वाढवला नाही. काँग्रेसने अनेक वर्षे राज्य केले. त्यांनी कायमच लोकांना गोंधळात टाकून त्यांचं मतदान घेतलं आहे. कोणत्याही घटनेचे राजकारण करणे. काँग्रेस पार्टी इर्शाळवाडीत का जाऊ शकली नाही. त्यांनीही सेवा कार्य करायला पाहिजे होते, अशी टीका त्यांनी केली.

Exit mobile version