फडणवीसांच्या वाढदिवशी भाजपाचा ‘लोकल कनेक्ट’; राज्यात ‘सेवा दिन’ साजरा करणार
Chandrashekhar Bawankule : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. या दुःखदायक घटनेत आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वाढदिवस साजरा करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत या निर्णयाची माहिती दिली. बावनकुळे म्हणाले, रायगड जिल्ह्यातील दुर्घटनेमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित न करता हा दिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय प्रदेश भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. सेवा दिनाच्या माध्यमातून पक्षाचे कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी , पदाधिकारी राज्यभर पूरग्रस्त नागरिकांना सहाय्य करतील.
पुण्याचा पठ्ठ्या अजितदादांना नडणार; विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकत थेट खर्गेंना धाडली चिठ्ठी
फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय सेवेसाठी पक्षातर्फे राज्यात ५० हजार रुग्णमित्र नियुक्त करण्याचा निर्णयही घेतला आहे. सेवा दिनी रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्रदान शिबीर, कृत्रिम अवयवांचे वाटप, पूरग्रस्त कुटुंबांना अन्न वाटप असे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त स्थिती असेपर्यंत आरोग्यसेवा व अन्य उपक्रम सुरू राहणार आहेत.
२८ हजार ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक आणि शहरी भागात प्रभागात एक असे ५० हजार कार्यकर्ते रुग्णमित्र म्हणून काम करणार आहेत. या अभियानाच्या संयोजकपदी डॉ. अजित गोपछडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे . मोदी सरकारने तसेच राज्य सरकारने सुरु केलेल्या विविध आरोग्य विषयक योजनांचे लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी हे रुग्णमित्र काम करणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
Mamata Banerjee यांच्या सुरक्षेत मोठी गफलत; बंदूक, चाकू घेऊन इसम थेट निवासस्थानाजवळ