लाडक्या बहीणींना 2100 रुपयांची घोषणा नाहीच…अर्थसंकल्पात काय मिळालं?

No Announcement For Ladki Bahin of rs 2100 Installment : आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2025) सादर झालाय. परंतु अर्थसंकल्पातून लाडक्या बहि‍णींच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. कारण अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींना योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता 2100 रूपये मिळणार की नाही, यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी (Mukhyamantri […]

Ladki Bahin Yojna

Ladki Bahin Yojna

No Announcement For Ladki Bahin of rs 2100 Installment : आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra budget 2025) सादर झालाय. परंतु अर्थसंकल्पातून लाडक्या बहि‍णींच्या पदरी मात्र निराशाच आली आहे. कारण अजित पवार यांनी लाडक्या बहि‍णींना योजनेचा (Ladki Bahin Yojana) हप्ता 2100 रूपये मिळणार की नाही, यासंदर्भात कोणतीही घोषणा केलेली नाही. परंतु मुख्यमंत्री माझी लेक लाडकी योजनेसाठी (Mukhyamantri Majhi Lek Ladki Yojana) 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं अजित पवार यांनी सांगितलंय.

Video : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर वाढवणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

विधानसभेमध्ये अजित पवार यांना लाडक्या बहिणांना 2100 रूपयांचा हप्ता मिळणार की नाही, सवाल विचारण्यात आला होता. यावर अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, अर्थसंकल्प होवू द्या, मग सांगतो. 2100 रूपये कधी मिळणार यासंदर्भात कोणतंच अपडेट न समजल्यामुळे लाडक्या बहि‍णींमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येतोय. यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च देखील झालाय. सन 2025-26 मध्ये या योजनेसाठी एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग अनेक महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केलाय. या गटांना अजून प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचा विचार सुरू आहे, असं देखील अजित पवार यांनी सांगितलंय.

मोठी बातमी! राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार, अजित पवारांची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना ठरली. या योजनेच्या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. तसेच अर्थसंकल्पामध्ये या योजनेची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्याबाबत विचार केला जाईल, सांगितलं जात होतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या या योजनेचा हप्ता कधीपासून वाढणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. परंतु यासंदर्भात आज अर्थसंकल्पात कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

 

Exit mobile version