Video : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर वाढवणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

Video : कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापर वाढवणार, अर्थमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Budget 2025-26 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सोमवार (दि. 10 मार्च)रोजी दुपारी २ वाजता राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मंत्री पवार यांनी अनेक घोषणा केल्या आहेत. (Budget) तसंच, काही नव्या धोरणांचीही माहिती दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने त्यांनी महायुती सरकार आता कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखणार असल्याचं सांगितलं

काळी माती ज्याची शान, तिच्यात राबे विसरुनी भान ! पोशिंदा हा आहे आपला, कृतज्ञतेने ठेवू जाण ! देऊ योजना अशा तया की राहिल त्याचे हिरवे रान !! वरील ओळी म्हणत अजित पवार यांनी कृषी क्षेत्रावर भाष्य केलं. ते म्हणाले, शेती आणि शेतकरी हा आपल्या जीवनाचा मूलाधार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुनमी आता शेती आणि शेतीसंबंधित क्षेत्राच्या योजना आणि तरतुदींकडे वळतो. कृषि क्षेत्रामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराचे धोरण आखण्यात येत आहे.

Video : सरकार पायाभूत सुविधांमध्ये मोठं काम करणार; अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा

शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसंच, शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘कृत्रिम बुध्दिमत्ता’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 50 हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला त्याचा फायदा होईल. येत्या दोन वर्षात त्यासाठी ५०0 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे असही अजित पवार म्हणाले आहेत.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांतील ७ हजार २०१ गावांमध्ये राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी सन 2025-26 मध्ये ३५१ कोटी ४२ लाख रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. यामध्ये सर्वत्र चर्चेत असलेले ‘चॅट-जीपीटी’ हेही एक चॅटबॉटच आहे. त्यामध्ये आपण काही प्रश्न विचारले की त्याची सखोल उत्तरे किंवा प्रदीर्घ लेख, कविता, निबंध इ. लिहून देऊ शकतो. कारण त्यामध्ये जगभरातील सर्व विषयांची सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे.

आजवर ज्या रचना या केवळ माणसांच्या सृजनशीलतेच्या परिघातच शक्य वाटत होत्या, त्याही हा चॅटबॉट तयार करू शकतो. असा त्यांच्या निर्मात्यांचा दावा आहे. आजवर फक्त एकाच कंपनीने असा चॅट जीपीटी बाजारात उतरवला होता. मात्र, या स्पर्धेमध्ये अनेक तंत्रज्ञान कंपन्या उतरल्या असून, लवकरच त्यांचेही अधिक प्रगत असे चॅटबॉट बाजारात उपलब्ध असतील. ‘चॅट-जीपीटी’चा वापर काही तंत्रज्ञान स्नेही आणि प्रगतिशील शेतकरी व त्यांचे गट करू लागले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube