मोठी बातमी! राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार, अजित पवारांची घोषणा

मोठी बातमी! राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार, अजित पवारांची घोषणा

Maharashtra Budget 2025 : राज्यात येत्या पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करताना  केली. यावेळी अजित पवार म्हणाले की, उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा 55 किलोमीटर लांबीचा 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. तसेच पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. ⁠तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असं अजित पवार यावेळी म्हणाले.

तसेच महानगरातील प्रवाशांना वातानुकुलित प्रवाससाठी मेट्रोचे प्रकल्प कार्यान्वित, मुंबई पुण्यात 64 किमीचे मेट्रो मार्ग सुरु होतील. पाच वर्षात 237 किमीचे मेट्रो मार्ग तयार करण्यात येणार असल्याचीही माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर नागपूर मेट्रोचा पहिला 40 किमीचा टप्पा पूर्ण झाला आहे. ठाणे मेट्रो, पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली असल्याची माहितीही यावेळी अजित पवार यांनी दिली.

औद्योगिक धोरण 2025 लवकरच जाहीर करू, अजितदादांची मोठी घोषणा 

याच बरोबर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळाला जोडणारी मेट्रो सेवा निर्माण करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी मिटणार, रस्त्यांसाठी साडेसहा हजार कोटी खर्च होणार

तर यावेळी अजित पवार यांनी आणखी एक मोठी घोषणा करत पुणे जिल्ह्यातील रस्त्यांसाठी साडेसहा हजार कोटी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली.

अजित पवार म्हणाले की,  पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या 7 हजार 515 कोटी रुपये किंमतीच्या उन्नत मार्गाचे बांधकाम हाती घेण्यात येत आहे. तळेगाव-चाकण-शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत चार पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. असं यावेळी अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube